नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसोबत झालेल्या बैठकीत आणि गोळीबाराचा कट रचण्यात पाटील यांचा सहभाग आढळल्यामुळे ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे खून प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पंचवटीतील गोळीबार प्रकरणात पाटील यांच्या अटकेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे नेते गिरीश महाजन नाशिक
शहरात असतानाच ही कारवाई झाली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, पाटील यांना अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेलं आहे. उद्या सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक
दरम्यान, पाटील यांना अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेलं आहे. उद्या सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य