संगमनेर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कात 20% वाढ केल्याच्या निषेधार्थ, ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने सोमवारी संगमनेरमध्ये आंदोलन केले आहे. ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
याबाबत बोलताना अनिकेत घुले म्हणाले, पुणे विद्यापीठ खोटं बोलत आहे की त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही शुल्कवाढ केली नाही. पूर्वी 25,000 रुपये असलेले बीसीएचे शुल्क आता 40,000 रुपये झाले आहे. तसेच, 14,000 रुपये असलेली इतर अभ्यासक्रमांची फी 30,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारी आहे.
घुले यांनी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील काही कळत नसेल, तर तुम्ही राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. शुल्कवाढीमुळे गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलांना आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याचे सांगत, त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला.
या आंदोलनात, ‘छात्र भारती’च्या कार्यकर्त्यांनी शुल्कवाढीच्या परिपत्रकाची प्रत जाळून आपला निषेध नोंदवला. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं! अशा घोषणा देत त्यांनी विद्यापीठाचा आणि सरकारचा निषेध केला. यावेळी घुले यांनी पुणे विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत घसरलेला दर्जा देखील अधोरेखित केला आणि विद्यापीठावर शिक्षण एकप्रकारे व्यापार बनवल्याचा आरोप केला. त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा उल्लेख करत, शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याची मागणी केली.
विद्यापीठाच्या शिक्षण शुल्कवाढीविरोधात ‘छात्र भारती’चे जोरदार आंदोलन
शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. 'छात्र भारती'चे अनिकेत घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.





याबाबत बोलताना अनिकेत घुले म्हणाले,
या आंदोलनात, ‘छात्र भारती’च्या कार्यकर्त्यांनी