Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आता मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं, मंत्र्यांची गाडी अडवण गुन्हा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
राजकारण

आता मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं, मंत्र्यांची गाडी अडवण गुन्हा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

विविध कारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनाना जेरीस आणणाऱ्या राज्य सरकारने आता काळे झेंडे दाखवणारे आणि रस्ते अडवणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधी पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आणि मराठवाड्यात पूर पाहणीसाठी आलेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचीही गाडी आडवण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल मंत्री बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवणारे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती, पिके आणि गुराढोरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना योग्य मदत, कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान मंत्री आणि भाजप नेते हे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची ही कृती बरोबर नाही. आमच्या अध्यक्षाची गाडी अडवणे, सोयाबीन फेकणे योग्य नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला निवेदन घ्यायला बोलावलं तर मी आलो असतो. गाडी अडवणं काळे झेंडे दाखवणं बरोबर नाही. काँग्रेस कार्यकर्ते जर अशा पद्धतीने वागणार असतील तर मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल. जशास तसे करावे लागेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.

मंत्री बावनकुळे म्हणाले, चव्हाणांच्या गाडीवर सोयाबिन फेकण्यात आलं, याबद्दल पोलीस आयुक्तांना सांगणार आहे. ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारशी काम आहे तर मला निवेदन द्यायला पाहिजे. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी का थांबवलं नाही, असा पोलिसांनाही जाब पालकमंत्री बावनकुळे यांनी विचारला. यानंतर असं झालं तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी पोलिस खात्याला दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 494
चंद्रशेखर बावनकुळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.