संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) सकाळी कंटेनर आणि टिप्परमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आदल्या दिवशी (गुरुवारी) झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते, तर एका महिलेचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डी एन 09 एस 9484 क्रमांकाचा कंटेनर घेऊन जाणारा चालक मोहम्मद सलीम (रा. वेदराम कॉलनी, हरियाणा) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याने एम एस 17 ए जी 5438 क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या टिप्परला जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावरून बाजूला केला, त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
हिवरगाव पावसा टोल नाका ते जावळे वस्ती या दरम्यान सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असल्याने सध्या या भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे या भागात अपघातांची संख्या वाढली असून, नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
त्यात भर म्हणून, नगर-मनमाड महामार्गावरील मोठे कंटेनर तळेगाव-संगमनेर मार्गे वळवण्यात आल्याने पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनरची संख्या लक्षणीय वाढली आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीकडून एकेरी वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप होत आहे. काम सुरू झाल्यापासून हिवरगाव टोल नाका ते आळेफाटा या पट्ट्यात १५ हून अधिक नागरिकांनी अपघातात आपले प्राण गमावले आहेत. या मालिकेमुळे प्रशासनाच्या आणि संबंधित कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या भागात जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
अपघाताची मालिका सुरूच : पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरीजवळ कंटेनर-टिप्परचा भीषण अपघात; चालक गंभीर, वाहतूक ठप्प
या भागात जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.





मिळालेल्या माहितीनुसार,
हिवरगाव पावसा टोल नाका ते जावळे वस्ती या
या भागात जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी