Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी

सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संपूर्ण संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या आगामी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी (०६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे असतील. तसेच, आमदार सत्यजीत तांबे, माधवराव कानवडे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी ही माहिती दिली आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने मागील गळीत हंगामात ८ लाख मॅट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले होते. शेतकरी, सभासद आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असून, या कारखान्याने सातत्याने ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव दिला आहे.

२०२५-२६ गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन पूजेचा मान कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सुविद्य पत्नींला मिळाला आहे. यात संचालक सतीश वर्पे व सुनिताताई वर्पे, रामदास धुळगंड व इंदुबाई धुळगंड, रामनाथ कुटे व अलकाताई कुटे, गुलाब देशमुख व उज्वलाताई देशमुख, अरुण वाकचौरे व विद्याताई वाकचौरे यांच्याहस्ते ही पूजा होणार आहे.

या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी, सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संपूर्ण संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 800
थोरात कारखाना बॉयलर अग्नी प्रदीपन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.