Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

26/11/2026

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेवरील अत्याचार प्रकरणी संगमनेर पोलिसांनी राजस्थानमध्ये केला आरोपी जेरबंद, पोलीस कोठडी; दुसरा आरोपी अद्याप फरारच
न्यायालय

महिलेवरील अत्याचार प्रकरणी संगमनेर पोलिसांनी राजस्थानमध्ये केला आरोपी जेरबंद, पोलीस कोठडी; दुसरा आरोपी अद्याप फरारच

पीएसआय अजय कवठे, हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, पोलीस नाईक दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या घराचा शोध घेत तेथून आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर दोघाजणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घारगाव संगमनेर पोलिसांनी यातील एका आरोपीला थेट राजस्थान मधून जेरबंद केले आहे. पकडलेल्या आरोपीला शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस करून ठेवण्याचा आदेश दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्यापही फरारच आहे.

१५ सप्टेंबरला घडलेल्या या प्रकाराला पीडित महिलेने १ ऑक्टोंबरला संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर वाचा फुटली होती. याप्रकरणी पोलिसांनी गणपत उर्फ गणेश जैसाजी प्रजापति (वय २६ वर्ष, मूळ रा. मंडवारीया पोस्ट बरलूट, ता. जि. सिरोही, राजस्थान) आणि सैफुल्ला अबूतय्यब शेख (हल्ली रा. १४ नंबर, नारायणगाव, पुणे) या दोघां विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ३५१(१)(३), ३(५), अनुसूचित जाती व जमाती अधिनियम कलम ३(२)(५) अनुसार गुन्हा दाखल केला होता. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणी तपास करत होते.

फिर्यादी पिडीत महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी अकलापूर रोडवर घारगाव येथे भोलेशंकर नावाच्या पाणीपुरीच्या दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. तेव्हा पाणीपुरी विक्री करणाऱ्या गणेश प्रजापती यांनी फिर्यादीस तुझ्या भावाला माझ्याकडे पाणीपुरीच्या दुकानावर कामाला पाठव असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्याला नकार दिल्याने आरोपी गणेश प्रजापती यांनी घरी साफसफाईचे काम करणार का अशी विचारणा करत फिर्यादीला घरी घेऊन गेला. तेथे फिर्यादीच्या संमतीशिवाय त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर प्रजापती आणि दुसरा आरोपी बेकरीवाला सैफुल्ला शेख याला फोन करून बोलावून घेतले त्याने देखील पीडित महिलेवर अत्याचार केले तसेच कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. 

तपास अधिकारी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके नेमण्यात आली होती. यातील एक आरोपी गणेश प्रजापती हा राजस्थानमध्ये आपल्या घरी असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. पीएसआय अजय कवठे, हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, पोलीस नाईक दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या घराचा शोध घेत तेथून आरोपीला ताब्यात घेत शनिवारी पहाटे त्याला अटक केली.

तपास अधिकाऱ्यांच्यावतीने घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर व सुभाष बोडके यांनी शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी न्यायालयाकडे आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नेरर्लेकर यांनी आरोपीला सात ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,599
अत्याचार गुन्हेगारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

19/11/2026

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

By Annant Ppangarkar26/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज- अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण, प्रलंबित नळ योजनांची…

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

26/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.