Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘त्या’ कारवाई प्रकरणी वेदांत वाईन्सच्या मालकांचा पत्रकार परिषदेतून खुलासा, नियमबाह्य मद्य विक्री नाही तर…
महाराष्ट्र संवाद विशेष

‘त्या’ कारवाई प्रकरणी वेदांत वाईन्सच्या मालकांचा पत्रकार परिषदेतून खुलासा, नियमबाह्य मद्य विक्री नाही तर…

एका वृत्तपत्रात आलेल्या वृत्तात वेदांत वाईन्स शॉपमधून 'खोके विक्री' आणि 'अल्पवयीन मुलांना मद्य विक्री' होत असल्याची बातमी प्रकाशित झाली होती, ती पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2025Updated:04/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अहिल्यानगर एलसीबीच्या पोलीस पथकाने संगमनेरमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच कारवाई दरम्यान पकडलेली दारू ही वेदांत वाईन्समधून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली असली तरी वेदांत वाईन्समधून अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे मद्याची नियमबाह्य विक्री झालेली नसून याप्रकरणीचे दावे फेटाळताना संबंधितांनी एक-दोन बाटल्यांच्या माध्यमातून अवैध साठा करून त्याची विक्री केल्याची शक्यता वेदांत वाईन्सच्या संचालकांनी वर्तवली आहे. 

एलसीबीच्या कारवाईत अवैध मद्य विक्री केल्याप्रकरणी संबंधित आरोपींसह वेदांत वाईन्सच्या चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, या अनुषंगाने संबंधितांनी सर्व आरोप फेटाळून लावत यासंबंधी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा केला आहे. संबंधित प्रकार व्यापारी स्पर्धेतून बदनामीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेदांत वाईन्सचे मालक स्वामी डाके यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, नियमांचे पालन करूनच केवळ वैध परवानाधारकांनाच शासकीय मर्यादेत मद्यविक्री केली जात आहे. तसेच या कारवाईमुळे आमच्या प्रतिष्ठित 17-18 वर्षांच्या परंपरेला आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा गेल्याचा आम्हाला खेद वाटतो. मात्र, ‘जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे,’ ही आमची ठाम भूमिका आहे.

एका वृत्तपत्रात वेदांत वाईन्स शॉपमधून ‘खोके विक्री’ आणि ‘अल्पवयीन मुलांना मद्य विक्री’ होत असल्याची बातमी प्रकाशित झाली होती, ती पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेदांत वाईन्समध्ये विक्री करताना ग्राहकांकडे वैध परवाना आहे की नाही, याची खात्री केली जाते. काही ग्राहकांना एक दिवसाचा, काहींना एक वर्षाचा, तर काहींना लाइफटाईम परवाना असतो. अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणे, हे आम्ही कधीच करत नाही. या कारवाईमागे व्यापारी वर्गातील प्रतिस्पर्ध्यांचे षडयंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालावर बोलताना स्वामी डाके यांनी खुलासा केला की, हा साठा पूर्ण बॉक्समध्ये नसून, फक्त 24 बाटल्या एका ठिकाणी आणि 34 बाटल्या दुसऱ्या ठिकाणी कारवाईदरम्यान सापडल्या आहेत. हा साठा दोन-तीन लोकांच्या माध्यमातून गोळा करून एकत्रित केलेला तसेच ड्राय डे च्या पार्श्वभूमीवर देखील अगोदर काही लोक आगाऊ दारू खरेदी करत असतात, त्या माध्यमातून केलेला हा मद्याचा साठा असू शकतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

शेवटी, सत्य लपवता येत नाही, आमच्यावर कितीही आरोप झाले तरी सत्य आमच्या बाजूने उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,048
खुलासा वेदांत वाईन्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.