Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा, थोरात कारखाना देणार प्रतिटन 3200 रुपये ऊस भाव; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या कर्जासह हेक्टरी 50 हजाराची मदत सरकारने देण्याची केली मागणी!
शेती व सहकार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा, थोरात कारखाना देणार प्रतिटन 3200 रुपये ऊस भाव; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या कर्जासह हेक्टरी 50 हजाराची मदत सरकारने देण्याची केली मागणी!

आज सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेरचे नाव अग्रगण्य आहे, मात्र काही लोक तालुक्याला बदनाम करत असून, खोट्या केसेस टाकून बाहेरच्या संदेशावर काम करत आहेत, अशी खंत व्यक्त केली. नुसते फ्लेक्स लावण्याऐवजी मदत करा, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2025Updated:06/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3200 रुपये भाव देणार आहे. विक्रमी ऊस भावाची घोषणा करतानाच राज्य सरकारचे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. याचबरोबर, पंजाब सरकारप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2025-26 च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आज (सोमवारी, ६ ऑक्टोंबर) उत्साहात पार पडला. यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले आदी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, थोरात सहकारी साखर कारखान्याने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित काटकसर, अचूकता आणि पारदर्शक निर्णय घेत कायम चांगली वाटचाल केली आहे. साखर कारखानदारीत मोठी स्पर्धा असून, उसाची पळवापळवी होणार असली तरी, यावर्षी थोरात कारखाना प्रति टन 3200 रुपये भाव देणार आहे. कारखान्याला दरवर्षी किमान नऊ लाख मेट्रिक टन गाळप करणे आवश्यक आहे, मात्र कारखान्याने 15 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. 

कार्यक्षेत्रातील व बाहेरील सभासद आणि ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असल्याचे थोरात यांनी नमूद केले. आगामी काळात कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करत संगमनेर आणि अकोले तालुक्यात सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आपण मंत्री असताना 2005-06 मध्ये जशी मदत केली होती, तशी मदत आता सरकारने करावी, असेही ते म्हणाले.

तालुका सततच्या विकास कामातून वैभवशाली बनवला आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेरचे नाव अग्रगण्य आहे, मात्र काही लोक तालुक्याला बदनाम करत असून, खोट्या केसेस टाकून बाहेरच्या संदेशावर काम करत आहेत, अशी खंत व्यक्त केली. नुसते फ्लेक्स लावण्याऐवजी मदत करा, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला. तालुक्यातील विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी आपल्यातील मतभेद दूर करावेत. आपण धार्मिक आहोत, हिंदूधर्मीय आहोत, परंतु इतर धर्माचा द्वेष करत नाही. मानवता हा धर्म घेऊन आपण चालत आहोत. सर्वांनी तालुक्याची वाटचाल जपण्यासाठी कटिबद्ध रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

  • माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्याला दिशादर्शक असे कारखान्याचे काम सुरू असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम चांगले निर्णय घेतले जातात. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर हा कारखाना देशातील कारखान्यांसाठी आदर्शवत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, निर्मला राऊत, संतोष हासे, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदरबाई डूबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे, राजेंद्र चकोर, नानासाहेब शिंदे, सुरेश थोरात, शांताराम कढणे, नवनाथ आंधळे, विष्णुपंत रहाटळ, विठ्ठल असावा, सिताराम वर्पे, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह सभासद, शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले, तर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,853
गळीत हंगाम थोरात कारखाना बाळासाहेब थोरात बॉयलर अग्नी प्रदीपन सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.