Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक गुन्हे शाखेकडून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेकडून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे असिफ अतिक शेख (वय २८, रा. चांदा, ता. नेवासा) आणि अविनाश मोहन बराटे (वय ३७, रा. बराटे वस्ती, घोडेगाव, ता. नेवासा) अशी सांगितली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणलेली चार गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६,६०,०००/- (सहा लाख साठ हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, तसेच पोलीस अंमलदार दिपक घाटकर, शामसुंदर गुजर, बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, विशाल तनपुरे, महादेव भांड यांच्या पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीत माहिती काढण्यास सुरुवात केली.

शनिवारी माहिती काढत असताना, पथकाला आसिफ शेख आणि अविनाश बराटे हे दोघे गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने बराटे वस्ती, घोडेगाव या ठिकाणी जाऊन खात्री केली असता, दोन व्यक्ती पिकअप वाहनातून जनावरे खाली उतरवताना आढळले.

पोलिसांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे असिफ अतिक शेख (वय २८, रा. चांदा, ता. नेवासा) आणि अविनाश मोहन बराटे (वय ३७, रा. बराटे वस्ती, घोडेगाव, ता. नेवासा) अशी सांगितली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १,६०,०००/- रुपये किमतीची ०४ गोवंशीय जिवंत जनावरे आणि ५,००,०००/- रुपये किमतीची पिकअप गाडी (क्र. एम.एच. १७ बी. डी. ०११२) असा एकूण ६,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गु.र.नं. ३७१/२०२५ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ५(ब), ९(ब) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 607
अहिल्यानगर एलसीबी गोवंश कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.