Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऐतिहासिक निर्णय… दिवाळीचा गोडवा दुप्पट! थोरात कारखान्याकडून सभासदांना यंदा इतकी मोफत साखर भेट, साखर वाटपाचे वेळापत्रक जाहीर
शेती व सहकार

ऐतिहासिक निर्णय… दिवाळीचा गोडवा दुप्पट! थोरात कारखान्याकडून सभासदांना यंदा इतकी मोफत साखर भेट, साखर वाटपाचे वेळापत्रक जाहीर

कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपये तर कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना प्रति टन १०० रुपये इतकी अतिरिक्त रक्कम दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदा दिवाळीनिमित्त आपल्या सभासदांना मोठे गिफ्ट दिले आहे. कारखान्याने यंदा दरवर्षीपेक्षा दुप्पट, म्हणजेच प्रत्येक सभासदाला ३० किलो मोफत साखर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साखरेचे वाटप १५ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर होणार आहे.

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू असून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने नेहमीच शेतकरी, सभासद, उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

या वर्षी, दिवाळीचा उत्साह वाढवण्यासाठी कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपये तर कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना प्रति टन १०० रुपये इतकी अतिरिक्त रक्कम दिली. यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मागील हंगामाचा एकूण ऊस भाव ३,२०० रुपये प्रति टन मिळाला आहे. तसेच, कामगारांना २०% बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदानदेखील देण्यात आले आहे.

मोफत साखर वाटपाचे वेळापत्रक व महत्त्वाचे नियम – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी १५ किलो साखर मोफत दिली जात होती. मात्र, संचालक मंडळांनी यंदा ३० सप्टेंबर २०२५ अखेर ज्यांचे शेअर्स मंजूर झाले आहेत, अशा सर्व सभासदांना प्रत्येकी ३० किलो मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारपासून (१५ ऑक्टोबर) शनिवारपर्यंत (१८ ऑक्टोबर) या साखरेचे वाटप होईल. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक १३ मधून सभासदांना साखर दिली जाईल. साखर घेण्यासाठी सभासदांनी कारखान्याने दिलेले ओळखपत्र (ID Card) सोबत आणणे अनिवार्य आहे. हे ओळखपत्र स्कॅन करून नोंदी घेणे आवश्यक असल्यामुळे ओळखपत्राची झेरॉक्स (छायाप्रत) कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. नोंदीच्या आधारावर गोडाऊन क्रमांक १३ मधून साखर दिली जाईल.

मयत सभासद असल्यास, त्यांच्या वारसांनी साखरेसाठी छापील अर्ज त्या-त्या गावांच्या सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध आहेत. मृत्यूचा दाखला आणि वारसाचे आधार कार्ड जोडून हा अर्ज शेअर्स विभागात सादर करणे आवश्यक आहे. ज्या सभासदांचे ओळखपत्र तयार झालेले नाही, त्यांनी साखर घेण्यासाठी येताना एक फोटो आणि आधार कार्ड सोबत आणावे.

स्वतः न येऊ शकणाऱ्या सभासदांना (प्रतिनिधीमार्फत साखर घेताना) सभासदाचा फोटो, आधार कार्ड आणि सोसायटी किंवा ग्रामपंचायतचे सही व शिक्का असलेले अधिकार पत्र घेऊन यावे लागणार आहे. तसेच, साखर घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे.

साखर वाटपाचा कालावधी १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच आहे. या कार्यक्रमानंतर असे अधिकार पत्र स्वीकारले जाणार नाही, याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.

व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्व सभासद बंधू-भगिनींना आवाहन केले आहे की, त्यांनी दिलेल्या वेळेत साखर घेऊन जावी व सहकार्य करावे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 954
थोरात कारखाना साखर वाटप कार्यक्रम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.