Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याची ऊस उत्पादकांना ‘दिवाळी भेट’: प्रती टन २०० रुपये अनुदान, एकूण २५.१० कोटी बँकेत वर्ग; अमृत उद्योग समूह संलग्न संस्थांच्या माध्यमातून १५० कोटी रुपये बाजाराची अर्थव्यवस्था बळकट करणार
शेती व सहकार

थोरात कारखान्याची ऊस उत्पादकांना ‘दिवाळी भेट’: प्रती टन २०० रुपये अनुदान, एकूण २५.१० कोटी बँकेत वर्ग; अमृत उद्योग समूह संलग्न संस्थांच्या माध्यमातून १५० कोटी रुपये बाजाराची अर्थव्यवस्था बळकट करणार

कारखान्याच्या सर्व सभासदांना कारखान्याच्यावतीने ३० किलो मोफत साखर वाटपाची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. सर्व सभासदांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन आपली साखर घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना मोठी भेट दिली आहे. २०२४-२०२५ हंगामात गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन २०० रुपयांप्रमाणे ऊस विकास अनुदान ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. ऊस विकास अनुदान, ठेव व ठेवीवरील व्याज, आणि कामगार बोनस अशा एकूण २५.१० कोटी रुपयांची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

३२०० रुपये प्रति टन उच्चांकी भाव – कारखान्याने प्रति टन २०० रुपयाप्रमाणे रक्कम वर्ग केल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना यंदा प्रति टन ३२०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. केवळ शेतकरीच नव्हे, तर कारखान्याच्या कामगारांच्या दिवाळीतही आनंद भरला आहे. कारखान्याने कामगारांना २०% बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.

व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे.

बाजारपेठेत १५० कोटींची उलाढाल, अर्थव्यवस्थेला बळकटी – यावर्षी दीपावलीनिमित्त वर्ग करण्यात आलेल्या रकमेचा तपशील देताना घुले म्हणाले की, ऊस विकास अनुदानाचे १२.५० कोटी, ठेव व ठेवीवरील व्याज ३.६० कोटी आणि कामगार बोनस ९ कोटी असे एकूण २५.१० कोटी बँकेत वर्ग झाले आहेत.

विशेष म्हणजे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि अमृत उद्योग समूहातील इतर सहकारी संस्थांकडून दिवाळीनिमित्त बोनस आणि इतर देण्यांसहित सुमारे १५० कोटी रुपये संगमनेरच्या बाजारपेठेत येणार आहेत. मागील एक वर्षापासून अस्थिर वातावरणामुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला या मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

सभासदांना ३० किलो मोफत साखर वाटप – याचबरोबर, कारखान्याच्या सर्व सभासदांना कारखान्याच्यावतीने ३० किलो मोफत साखर वाटपाची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. सर्व सभासदांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन आपली साखर घेऊन जावी, असे आवाहन व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 825
थोरात कारखाना बोनस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.