Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझ्या राजकीय प्रवासावर त्यांच्या अनुभवाचा ठसा, नगरच्या राजकारणाचा जादूगार हरपला – आमदार सत्यजित तांबे यांना शिवाजी कर्डिले यांच्या निधनाचा मोठा धक्का
श्रद्धांजली

माझ्या राजकीय प्रवासावर त्यांच्या अनुभवाचा ठसा, नगरच्या राजकारणाचा जादूगार हरपला – आमदार सत्यजित तांबे यांना शिवाजी कर्डिले यांच्या निधनाचा मोठा धक्का

यावर्षी पुन्हा त्यांच्या बुऱ्हाणनगर येथील दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात त्यांना भेटायला मिळेल. पण आज ही दुःखद बातमी ऐकताना त्या आठवणी अधिकच मनाला चटका लावून गेल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तांबे म्हणाले की, ‘प्रस्थापित नसतानाही आपल्या कर्तृत्वाने दोन दशकांहून अधिक काळ अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे कर्डिले साहेबांचे जाणं अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारं आहे.

दुःख व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले तांबे… प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून मागील दोन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वातून एक वेगळाच दबदबा निर्माण करणारे माजी मंत्री, राहुरी विधानसभेचे आमदार व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी आहे.

मागील काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. स्वतः पैलवान असलेले, सकारात्मक आणि नेहमी हसतमुख असलेले हे व्यक्तिमत्त्व कधीही स्वतःच्या आजारपणाची चिंता केली नाही. मात्र आज त्यांना अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं जाणं हे सर्वांसाठीच मोठं वैयक्तिक दुःख आहे.

माझ्या जिल्हा परिषदेच्या काळापासून त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळातील त्यांची रणनीती, विचारांची खोली आणि संघटनशक्ती अनुभवण्याचा मला योग आला. त्यामुळे राजकारणातील त्यांच्या अनुभवाचा आणि स्पष्ट भूमिकेचा माझ्या राजकीय प्रवासावर ठसा आहे.

कायम लोकांमध्ये राहणारे, थेट बोलणारे आणि कृतीशील असे ते व्यक्तिमत्त्व होते. पैलवान स्वभावाचा माणूस म्हणून राजकीय डावपेचातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मी त्यांना नेहमीच म्हणायचो — “हे नगर जिल्ह्यातील राजकारणाचे जादूगार आहेत” कारण राजकीय रणनिती घडवण्याचं आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचं एक अनोखं कौशल्य त्यांच्याकडे होतं.

या निमित्ताने मला अरुण काका जगताप यांची आठवण होते. राजकारण, समाजकारण आणि माणुसकी यामध्ये समरस झालेला दिलदार मनाचा माणूस. त्यांचंही असंच अकाली जाणं मला मोठा धक्का देऊन गेलं होतं, आणि आता कर्डिले साहेबांचं जाणंही तसंच अंतःकरण हलवून टाकणारं आहे.

परवाच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ पाहिला आणि मनात विचार आला की, यावर्षी पुन्हा त्यांच्या बुऱ्हाणनगर येथील दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात त्यांना भेटायला मिळेल. पण आज ही दुःखद बातमी ऐकताना त्या आठवणी अधिकच मनाला चटका लावून गेल्या.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 693
शिवाजी कर्डिले सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.