Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ९ लाख लिटर दूध निर्मिती करणाऱ्या संगमनेरात भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर; सरकारने लक्ष देण्याची मागणी, वसुबारस निमित्त राजहंस दूध संघात गाईंचे पूजन
शेती व सहकार

९ लाख लिटर दूध निर्मिती करणाऱ्या संगमनेरात भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर; सरकारने लक्ष देण्याची मागणी, वसुबारस निमित्त राजहंस दूध संघात गाईंचे पूजन

दीपावली निमित्त दूध संघाने ४१ कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक, कामगार, व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठा आधार मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून, शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व अनमोल आहे. भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केली.

राजहंस दूध संघ येथे आज (शुक्रवार १७ ऑक्टोंबर) वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हॉइस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरखनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

रणजितसिंह देशमुख म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध व्यवसायामुळे तालुक्याची ग्रामीण आर्थिक व्यवस्था मजबूत झाली आहे. राजहंस दूध संघ गाईच्या दुधात राज्यात प्रथम क्रमांकाचा ओळखला जातो. दीपावली निमित्त दूध संघाने ४१ कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक, कामगार, व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. संगमनेरच्या सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.

वसुबारस निमित्त तालुक्यात गायींचे पूजन केले जात आहे. तालुक्यात मोठे पशुधन असून दररोज सुमारे ९ लाख लिटर दूध निर्माण होत आहे. मोठ्या परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. मात्र, भाकड जनावरांबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारने या जनावरांसाठी प्रभावी उपाययोजना राबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

तर व्हॉइस चेअरमन राजेंद्र चकोर म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे. तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शेतकरी बंधू व महिलांसह दूध संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 813
गोपूजन रणजीतसिंह देशमुख वसुबारस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.