Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘प्रवरा’चे ऊस उत्पादक व कामगार विखेंच्या कारभारावर संतप्त: ‘काळ्या दिवाळी’मुळे शेतकरी हवालदिल!
शेती व सहकार

‘प्रवरा’चे ऊस उत्पादक व कामगार विखेंच्या कारभारावर संतप्त: ‘काळ्या दिवाळी’मुळे शेतकरी हवालदिल!

आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना मिळालेले कोट्यवधी रुपयांचे पेमेंट पाहून प्रवरेच्या शेतकरी-कामगारांवर 'देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप रोया' असे म्हणण्याची पाळी आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2025No Comments7 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: दिवाळी सणाच्या तोंडावर एका बाजूला शेजारील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, दूध संस्था आणि अमृत उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांनी तब्बल १५० कोटी रुपये बाजारात आणल्याने संगमनेर परिसरातील बाजारपेठेची अर्थव्यवस्था बळकट होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र शेजारच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याची वेळ आली आहे. थकीत ऊस पेमेंट आणि अपुरा बोनस यामुळे विखे पिता-पुत्रांच्या कारभारावर प्रवरा परिसरातील शेतकरी मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे.

थकीत ऊस पेमेंटमुळे शेतकरी संकटात – ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे आनंदाचा सण असतो. मात्र, अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीच्या पहाटेपर्यंतही मागील वर्षातील उसाचे कबूल केलेले प्रति टन ३०० रुपये पेमेंट अद्याप जमा झालेले नाही. इतर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याच्या बातम्या प्रवरा परिसरातील शेतकरी केवळ ऐकत आणि वाचत आहेत.

‘व्याजाचे तुटपुंजे पेमेंट’: केवळ देखावा – कारखान्याने फक्त व्याजाचे तुटपुंजे पेमेंट जमा केले असून, तेही ‘अत्यल्प’ असल्याचे शेतकरी मंडळाचे म्हणणे आहे. ज्यांचे शेअर्स अपूर्ण आहेत, त्यांचे व्याज परस्पर शेअर्स खात्यात जमा झाले आहे. शेअर्स पूर्ण असलेले शेतकरी खूप कमी असल्याने, हे व्याजाचे पेमेंट काही लाखांतच मोजता येईल. त्यामुळे हे पेमेंट परिसरात मिळाले काय आणि न मिळाले काय, ते ‘नगण्य’च ठरले आहे.

कामगारांचा बोनसही ‘शेळीच्या शेपटी’प्रमाणे – कामगारांच्या बोनसची स्थितीही फारशी चांगली नाही. कायमस्वरूपी कामगार खूप कमी असून, बहुतांश कंत्राटी मजूर गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे केवळ २० टक्के बोनसचा लाभही फार थोड्या कुटुंबांना मिळणार आहे. त्यातही कामगारांचे काही महिन्यांचे पगार थकीत असल्याने, आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना मिळालेले कोट्यवधी रुपयांचे पेमेंट पाहून प्रवरेच्या शेतकरी-कामगारांवर ‘देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप रोया’ असे म्हणण्याची पाळी आली आहे.

महाशिवपुराण आणि अमित शहांच्या कार्यक्रमांवर कोट्यवधींचा चुराडा – शेतकरी आणि कामगारांच्या या भळभळत्या जखमांवर ‘मीठ चोळण्याचे’ काम महाशिवपुराण कथा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमांनी केल्याचा आरोप शेतकरी मंडळाने केला आहे.

महाशिवपुराण कथेवर जवळपास १५ ते १७ कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. कथेसाठी आलेल्या महाराजांना कोट्यवधींची फी आणि चार-पाच कोटींची गाडी दक्षिणा म्हणून देण्यात आली.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेवरही तब्बल ४ ते ६ कोटी रुपयांचा चुराडा झाला. भव्य मंडप, वॉटरप्रूफिंग, जेवण आणि हजारो प्रवासी बसेसच्या नियोजनावर हा खर्च झाला.

या दोन्ही कार्यक्रमांवर अंदाजित २० ते २२ कोटी रुपये खर्च झाले असून, तो ‘जनसेवा मंडळा’ने केल्याचे उघड दिसते. हा पैसा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी वापरला असता, तर ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याची वेळ आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

‘शेतकरी माजतील’ हाच कानमंत्र कारणीभूत? – प्रवरा कारखान्याला केंद्र शासनाकडून मिळालेले ४०० कोटी रुपये अद्यापही मोठ्या प्रमाणावर अखर्चित असताना, शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न देणे हे विखे घराण्याच्या ‘शेतकऱ्यांच्या हातात पैसा गेला तर ते माजतील’ या भूमिकेमुळेच होत असल्याचा आरोप शेतकरी मंडळाने केला आहे. पद्मभूषण विखे पाटलांनी शरद जोशींच्या आंदोलनाच्या वेळी जाहीरपणे हा ‘कानमंत्र’ सांगितला होता, तोच आज शेतकरी आणि कामगारांच्या कानात ‘शिसे ओतत’ असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.

एकनाथ घोगरे पाटील (मु. लोणी खु), बाळासाहेब विखे पाटील (लोणी बु), आणि अरुण कडू पाटील (सात्रळ ता. राहुरी) यांनी विखे पिता-पुत्रांचा जाहीर निषेध केला आहे. ‘शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे कबूल केलेले पैसे देऊन कामगार-शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

समाज माध्यमावरील व्हायरल पोस्ट जशीच्या तशी….

प्रवरा कारखाना शेतकरी कामगारांची काळी दिवाळी ऐन दिवाळीत उसाचे पेमेंट न करणाऱ्या विखे पिता पुत्रांचा प्रवरा शेतकरी मंडळाच्यावतीने जाहीर निषेध.

        प्रकाशक व निवेदक :

        एकनाथ घोगरे पाटील मु. लोणी खु ll

        बाळासाहेब विखे पाटील लोणी बु ll

        अरुण कडू पाटील सात्रळ ता. राहुरी

  1. देख के दुनिया की दिवाली,दिल मेरा चुपचाप रोया’ बऱ्याच जणांना चित्रपटातील हे दर्दभरे गाणे आठवत असणारच ? आज खरोखरीच प्रवरेच्या शेतकऱ्यांना आठवणारच हे गाणे. आणि या आठवणीतून त्यांच्या दबलेल्या भावना तशाच दबलेल्या आहेत. दिवाळीचा काळ म्हणजे ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने व आनंद आणणारा सण असेच म्हणावे लागेल. अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. आज दीपावलीच्या निमित्ताने चहू बाजूने बातम्या येत आहेत. कुणा कारखान्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 32 कोटी, कुणा दूध संघाने 16 कोटी, कुठल्या खाजगी दूध संस्थेने कोटी कोटी बँकेत वर्ग केले. या व अशाच प्रकारच्या बातम्या आज प्रवरा परिसरातील शेतकरी फक्त ऐकतो आणि वाचतो आहे. मात्र आज अखेरीपर्यंत दीपावलीच्या पहाटपर्यंत त्याच्या खात्यावर मागील वर्षाच्या उसाचे कबूल केलेले प्रति टन तीनशे पेमेंट सुद्धा अद्यापही जमा झाले नाही.
  2. अगदीच कोणाला उल्लेखच करायचा असेल तर प्रवरा कारखान्याने फक्त आणि फक्त व्याजाचे तुटपुंजे पेमेंट जमा केलेले आहे. हे पेमेंट सुद्धा अत्यल्प अत्यल्प म्हणावे असेच आहे. त्याचे कारण ज्यांचे शेअर्स अपूर्ण आहेत त्यांना व्याजच नाही त्यांचे व्याज परस्पर शेअर्स खाते जमा होते. आणि शेअर्स पूर्ण झालेले शेतकरी संख्येने खूपच कमी आहेत. हे व्याजाचे पेमेंट अगदी सर्व मिळून काही लाखांमध्ये मोजता येईल इतकेच आहे. त्यात व्याजाचे पेमेंट मिळालेले हे शेतकरी कुटुंबे खूप म्हणजे खूपच कमी आहेत. तेव्हा ही व्याजाचे पेमेंट परिसरात मिळाले काय न मिळाले काय ते नगण्यच आहे.
  3. कामगारांचे संदर्भातील बोनस हाही परिसरात नगण्य स्वरूपातच गणला जात आहे. त्याचे स्वरूप अगदी शेळीच्या शेपटासारखेच आहे. ते ना माशा मारते ना अब्रू झाकते! कारण प्रवरेचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर कारखान्यात कायमस्वरूपी कामगार खूपच कमी आहेत. बाकी सर्व कंत्राटी मजूर पाच पंचवीस वर्षांपासूनचे आहेत अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना 20% बोनस खूप थोड्या कुटुंबात हा अल्पस्वल्प पैसा जाणार आहे. त्यातही कामगारांचे काही महिन्यांचे पगारही थकीत आहेत. आणि म्हणून आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांना व कामगारांना मिळालेल्या कोटी कोटी रुपयांचे पेमेंट मिळालेले आहेत आणि म्हणूनच ‘देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप रोया’ असेच म्हणण्याची पाळी शेतकरी व कामगारांवर आलेली आहे.
  4. प्रवरेच्या शेतकरी व कामगारांच्या भळभळत्या जखमांवर, दुःखावर आणखी डागण्या दिल्या, त्यावर अजून मीठ चोळले ते त्या महाशिवपुराण कथेने आणि केंद्रात गृह व सहकार खाते सांभाळणारे अमित शहा यांच्या कार्यक्रमाने. या कार्यक्रमाची कोटी कोटीची उड्डाणे पाहिली तर थक्क व्हायच्या ऐवजी मन चिडून उठते. तो महाराज पुराण कथा वाचायला आला की, विखेंची स्तुती सांगतोय ? त्यासाठी त्याला कोट्यावधी रुपये फी ऐकायला मिळते. वरून परत त्याला तब्बल चार पाच कोटींची गाडी दक्षिणा म्हणूनही दिली. तीन-तीन मंडपांचा खर्च जेवणाचा आणि हजार भर प्रवासी बसेसचा आणि इतर नियोजनाचा खर्च त्याचे काय वर्णन करावे ? अशा पद्धतीने हे शिव पुराण 15 कोटीच होतं की 17 कोटीच याचा हिशोब अजून लागायचा आहे. परंतु ही सर्व कोटी आणि कोटीचे आकडे फक्त ऐकतच राहायचे अशी दुर्दैवी वेळ प्रवरेच्या कामगार व शेतकऱ्यांवर आलेली आहे.
  5. केंद्रीय मंत्री अमित शहांची सभा अशीच भव्य दिव्य आणि कोटी कोटींचा चुराडा करणारी होती. ते आले बाप बेट्यांच्या, बाप लेकांच्या पुतळ्यांचे उद्घाटन करायला पण परिसराला भुर्दंड बसला तो तब्बल चार सहा कोटी रुपयांचा. तो मांडव, त्याचा भव्यपणा, त्याचं वॉटरप्रूफिंग, सभेला येण्यासाठीचे नियोजन केले गेले. जेवणावेळी वेगळ्याच. या सर्वांसाठी कोटींचा चुराडा झाला. हे सर्व कोटी कोटींचे आकडे ऐकून मनात चीड आली नाही तर नवलच समजावे. या पार्श्वभूमीवर आज प्रवरेचा शेतकरी हे सर्व उघड्या डोळ्याने पाहतो आहे. कोणाला वाटत असेल हे शिवपुराण आणि हे अमित भाईंचे पुराण याच्यातून आम्हाला काही लाभ होईल. परंतु ती आशा आता संपुष्टात आली आहे. दिवाळीच्या या काळात ते फक्त स्वप्नच ठरणार आहे अशी दुर्दैवी वेळ आलेली आहे.
  6. एक काळ असा होता की प्रवरेच्या शेतकऱ्याला दीपावलीच्या काळात व्याज आणि खोडकी वाढ्याचे पेमेंट म्हणून कारखान्याकडून पैसे मिळायचे. खऱ्या अर्थाने त्यांची दिवाळी व्हायची. आज तो फक्त इतिहासच राहिलेला आहे. शिवपुराण आणि अमितभाई पुराण याच्यासाठी जे 20-22 कोटी रुपये खर्च झाले ते जनसेवा मंडळाचे असे उघड उघड दिसते. किंबहुना या कार्यक्रमांचे प्रायोजक, आयोजक तेच होते. याच जनसेवा मंडळाने काही रुपये कारखान्याला दान दिले असते तर शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालीच नसती! तसेही कारखान्याला जनसेवा मंडळाकडून पैसे घेण्याची मुळी आवश्यकताच नाही. कारखान्याला केंद्र शासनाकडून मिळालेले चारशे कोटी रुपये अजूनही मोठ्या प्रमाणावर अखर्चित आहेत हे कारखान्याच्या वार्षिक अहवालावरून कळतेच आहे. त्यातला काही वाटा शेतकरी कामगारांना दिला असता तर किती चांगले झाले असते. मात्र कामगार शेतकऱ्यांचे भले व्हावे असे विखे घराण्याला कधी वाटलेच नाही. त्यांच्या चार पिढ्या शेतकरी आणि कामगारांना झुलवण्यात आणि त्यांचे शोषण करण्यातच गेल्या. ज्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होते त्यांनी नाही तरी एक कानमंत्र शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी जाहीररीत्या पद्मभूषण यांनी सांगितलेला आहेच. शेतकऱ्याच्या हातात पैसा गेला तर ते माजतील हाच तो त्यांचा कानमंत्र! हा कानमंत्र अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या कानात शिसे ओतील असे वाटले नव्हते. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या विखे पिता पुत्रांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आमच्या निषेधाची चीड किंवा चाड त्यांना असेल तर त्यांनी अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे, व कबूल केलेले घामाचे पैसे द्यायलाच हवेत व शेतकरी कामगारांची दिवाळी आनंदी करावी!
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,676
काळी दिवाळी प्रवरा कारखाना समाज माध्यम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.