Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026

गरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणजे अजिजभाई

28/11/2026

शाश्वत शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन ही काळाची गरज : आ. सत्यजीत तांबे

28/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अबब… संगमनेर आता ‘ड्रग्स’च्या विळख्यात! जिम सप्लिमेंटच्या दुकानातून तरुणाईला ‘नशेची इंजेक्शन्स’, लाखोंचा मुद्देमाल जप्त; धोकादायक अवैध धंद्याची नव्याने भर… पोलीस कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अबब… संगमनेर आता ‘ड्रग्स’च्या विळख्यात! जिम सप्लिमेंटच्या दुकानातून तरुणाईला ‘नशेची इंजेक्शन्स’, लाखोंचा मुद्देमाल जप्त; धोकादायक अवैध धंद्याची नव्याने भर… पोलीस कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

ड्रग विक्रीमुळे संगमनेर शहराच्या सुसंस्कृतपणाला बट्टा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संगमनेरकरांनी याप्रकरणी वेळीच सावधान होण्याची गरज आहे, अशाप्रकारे जर कोणी नशा करत असेल तर या संदर्भातील माहिती पोलिसांना कळविणे सुद्धा आवश्यक आहे, अन्यथा संगमनेरची ओळख उध्वस्त होऊन जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2025Updated:29/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहरातील अवैध धंद्यांमध्ये आता थेट नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची ‘ड्रग्स’ अर्थात अमली पदार्थांची भर पडल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत चर्चा सुरू असलेल्या या व्यवसायासंदर्भात आता पोलीस कारवाईमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. शहरातील एका नामांकित चौकातील ‘सप्लिमेंट शॉप’मध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणाईला नशेसाठी लागणारे ड्रग्स (इंजेक्शन) विनापरवाना विकले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. संगमनेरमधील तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठा राजकीय हस्तक्षेप झाला, त्यामुळे साडेतीन वाजता घडलेल्या या घटनेत तब्बल सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री उशिरा सव्वानऊ वाजता गुन्ह्याची नोंद झाली.

संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी ही कारवाई केली आहे. नगरपालिकेच्या रस्त्यावर, लाल बहादूर शास्त्री चौकातील ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप’मध्ये एका इसमाकडून नशेसाठी वापरले जाणारे ‘MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA’ हे औषध अवैधरित्या विकले जात आहे, अशी गोपनीय माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला ‘डमी ग्राहक’ बनवून सोमवारी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान औषध खरेदी करण्यासाठी दुकानात पाठवले. आणि कारवाईसाठी सापळा लावला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे हे इंजेक्शन विनापरवाना विक्री करत असल्याचे आढळून आल्याने या कारवाईत पोलिसांनी आदित्य किशोर गुप्ता या तरुणाला ताब्यात घेतले. 

त्याची झडती घेतली असता दुकानाच्या टेबलावर ६,६००/- किमतीच्या ‘MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA 10 ML’ च्या ०३ बॉटल्स आणि ०९ इंजेक्शन सिरींजसह एकूण २,२३,१२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये एक ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि एका यामाहा कंपनीच्या मोटारसायकलचा (MH.15.HP.6646) समावेश आहे. याप्रकरणी आरोपी आदित्य गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, १२५ आणि २७८ नुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राजकीय हस्तक्षेप – सदर प्रकरणात आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित महायुतीच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला, मात्र पोलिसांनी खमकी भूमिका दाखविल्याने अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली मात्र याप्रकरणी एफआयआर रात्री सव्वा नऊ वाजता दाखल झाली. या विषयात पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आला होता, कलमे कमी करण्याच्या अनुषंगाने सुद्धा हस्तक्षेप करण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती.


गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरात खुलेआम नशीले ड्रग्स – संगमनेरमध्ये आजवर ड्रग आलेले नव्हते, मात्र आता नाशिक, श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि पुणे इथून अवैध मार्गाने हे ड्रग तस्करी करून शहरात आणले जात असल्याच्या चर्चा सुरू असून यासंदर्भात पोलिसांकडेही मोठ्या प्रमाणावर गोपनीय माहिती उपलब्ध झालेली आहे. मात्र या सर्वांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. 


संगमनेरच्या सुसंस्कृतपणाला बट्टा – ड्रग विक्रीमुळे संगमनेर शहराच्या सुसंस्कृतपणाला बट्टा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संगमनेरकरांनी याप्रकरणी वेळीच सावधान होण्याची गरज आहे, अशाप्रकारे जर कोणी नशा करत असेल तर या संदर्भातील माहिती पोलिसांना कळविणे सुद्धा आवश्यक आहे, अन्यथा संगमनेरची ओळख उध्वस्त होऊन जाईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,129
ड्रग्स पोलीस कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

26/11/2026

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

By Annant Ppangarkar28/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका आणि परिसरातील कष्टकरी कामगार वर्ग तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अद्ययावत…

गरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणजे अजिजभाई

28/11/2026

शाश्वत शेतीसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन ही काळाची गरज : आ. सत्यजीत तांबे

28/11/2026

आज शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

28/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.