Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जीवनदान श्रेष्ठदान! संगमनेरात इंदिरा गांधींच्या स्मृतिप्रीत्यर्थ राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र’चे (RGSS) रक्तदान शिबिर उत्साहात; नागरिकांचा सहभाग
आरोग्य

जीवनदान श्रेष्ठदान! संगमनेरात इंदिरा गांधींच्या स्मृतिप्रीत्यर्थ राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र’चे (RGSS) रक्तदान शिबिर उत्साहात; नागरिकांचा सहभाग

नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील शिबिर स्थळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आयर्न लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, ‘राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र’ (RGSS) यांच्यावतीने संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर शुक्रवारी (दिनांक ३१ ऑक्टोबर) यशस्वीपणे पार पडले. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उदात्त हेतूने आयोजित या शिबिराला संगमनेरवासीयांनी उस्फूर्तपणे चांगला प्रतिसाद दिला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील शिबिर स्थळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जीवनदानाचा संकल्प’ करत राहुल गांधी समर्थक संघाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. शिबिरादरम्यान नवीन नगर रस्त्यावरील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. संगमनेर येथील बस स्टॅन्ड परिसरात सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात परिसरातील युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.

रक्तदान हे सर्वात मोठे दान मानले जाते. अपघातात जखमी झालेल्यांपासून ते गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांपर्यंत अनेकांना रक्ताची तातडीने गरज असते. अशावेळी केलेले रक्तदान हे खऱ्या अर्थाने जीवन संजीवनी ठरते, या उदात्त विचाराने प्रेरित होऊन नागरिक या पुण्यकार्यात सहभागी झाले.

या शिबिरात अर्पण या नामांकित रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. यासोबतच, रक्तदात्यांची मोफत रक्तगटाची चाचणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.

राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित या भव्य रक्तदान शिबिरामध्ये संगमनेर परिसरातील नागरिकांनी प्रचंड सहभाग घेऊन, गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाला यश मिळवून दिले. 

राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, कल्याण जोर्वेकर, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव, मोहसीन खलील शेख आदी आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे विशेष आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 447
रक्तदान शिबिर राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक…

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.