Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकगीतांचा खजिना नव्या रूपात! ११ नोव्हेंबर रोजी जाणता राजा मैदानावर ‘फोक आख्यान’, ट्रेंड असलेला तरुणाईचा आवडता कार्यक्रम तालुकास्तरावर प्रथमच
महाराष्ट्र संवाद विशेष

लोकगीतांचा खजिना नव्या रूपात! ११ नोव्हेंबर रोजी जाणता राजा मैदानावर ‘फोक आख्यान’, ट्रेंड असलेला तरुणाईचा आवडता कार्यक्रम तालुकास्तरावर प्रथमच

या कार्यक्रमात ७५ कलाकारांचा भव्य संच असून, अनेक मराठी चित्रपट आणि विविध मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते व अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त, मंगळवार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता ‘जाणता राजा मैदान’ येथे महाराष्ट्राच्या तरुणाईचा ‘ट्रेंड’ असलेला ‘फोक आख्यान’ हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सातत्याने विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार, राज्यभरातील तरुणांच्या पसंतीस उतरलेल्या ‘फोक आख्यान’च्या आयोजनाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राज्य व देश पातळीवरील अत्यंत दर्जेदार कार्यक्रम संगमनेरमध्ये होतात. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत असलेला, लोककला आणि संस्कृतीचा जागर नव्या, आकर्षक पद्धतीने मांडणारा ‘फोक आख्यान’ हा कार्यक्रम मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांनंतर तालुका पातळीवर प्रथमच होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

एकविरा फाउंडेशन आणि ‘आय लव संगमनेर चळवळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘फोक आख्यान’मध्ये भारुड, गवळण, देवीचा जागर, खंडोबाची गाणी, महाराष्ट्राची लोककला, आदिवासी गाणी, पारंपारिक व जात्यावरची गाणी, पोवाडे, लावणी, स्फूर्तीदायी गीते असा पारंपरिक लोकगीतांचा अनमोल खजिना नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे.

या कार्यक्रमात ७५ कलाकारांचा भव्य संच असून, अनेक मराठी चित्रपट आणि विविध मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते व अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जाणता राजा मैदानावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. युवकांनी कार्यक्रमाच्या पास नोंदणीसाठी https://event.ekvirafoundation.com या साइटवर संपर्क साधावा.

तरी शहर व तालुक्यातील सर्व नागरिक, महिला व युवकांनी या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, एकविरा फाउंडेशन आणि ‘आय लव संगमनेर चळवळ’ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 553
जयश्री थोरात फोक आख्यान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.