Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात खळबळ: नगराध्यक्षपदाच्या शिवसेना उमेदवारावर ‘दुहेरी मतदारा’चा सुषमा तवरेज यांचा आक्षेप, कायदेशीर बाबींमुळे उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता!
निवडणूक

संगमनेर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात खळबळ: नगराध्यक्षपदाच्या शिवसेना उमेदवारावर ‘दुहेरी मतदारा’चा सुषमा तवरेज यांचा आक्षेप, कायदेशीर बाबींमुळे उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता!

निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेतात आणि श्रीमती सुवर्णा खताळ यांच्या उमेदवारीचे भवितव्य काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनंत पांगारकर

संगमनेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारी अर्जावर नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या अपक्ष उमेदवार सुषमा तवरेज यांनी कायदेशीर आक्षेप नोंदवत अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केल्याने निवडणुकीच्या रिंगणात मोठी खळबळ उडाली आहे. हा आक्षेप थेट ‘दुहेरी मतदार नोंदणी’शी संबंधित असून, यामुळे उमेदवारी अर्जाची वैधता धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी अरुण मुंडे यांच्याकडे तवरेज यांनी हा आक्षेप नोंदविला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, खताळ यांचे नाव एकाच वेळी दोन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत समाविष्ट आहे.

श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या नावाची मतदार नोंदणी संगमनेर नगरपालिका मतदार यादीत यादीतील भाग क्र.157, अनुक्रमांक क्र. 339, South North Building Room No.4 From North, sir DM Petit Highschool, Akole bypas road Sangamner अशी असून दुसरी मतदार नोंदणी घुलेवाडी मतदार यादीतील भाग क्र. 52, अनुक्रमांक क्र. 339, East west Building Room No.3 from East. Sau Mathurabai Bhausaheb Thorat Madhyamik Vidyalaya Ghulewadi येथे देखील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० चे कलम १७ आणि १८ या कलमांनुसार, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त मतदार यादीत असणे हे कायद्याचे उल्लंघन मानले जाते आणि अशा परिस्थितीत उमेदवारी अर्ज अवैध ठरवला जाऊ शकतो. आक्षेप घेणाऱ्या तक्रारदार सुषमा संजय तवरेज यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने दोन्ही मतदार याद्यांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे. सदर उमेदवाराने दोन ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळवून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी त्वरित अपात्र ठरवावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

या गंभीर आक्षेपामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीतील तपशील (पत्ते आणि अनुक्रमांक) सादर करण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेतात आणि श्रीमती सुवर्णा खताळ यांच्या उमेदवारीचे भवितव्य काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,512
अरुण उंडे आक्षेप उमेदवारी अर्ज सुवर्णा खताळ सुषमा तवरेज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.