Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मागील एक वर्षात शहर अस्वस्थ! – संगमनेरच्या शांततेबद्दल बाळासाहेब थोरातांनी कळीचा मुद्दा उचलला… विकासासोबत बंधुभाव हवाच; लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन सेवा समितीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू
निवडणूक

मागील एक वर्षात शहर अस्वस्थ! – संगमनेरच्या शांततेबद्दल बाळासाहेब थोरातांनी कळीचा मुद्दा उचलला… विकासासोबत बंधुभाव हवाच; लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन सेवा समितीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू

अनेकांनी सेल्फीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याभोवती गराडा घातला. संगमनेरी सेवा समितीच्या उमेदवारांसाठी मतदारांमधील मोठा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्याला आणि शहराला विकासाची मोठी परंपरा आहे. आपण सातत्याने निधी आणून निळवंडे पाईपलाईन, हायटेक बस स्थानक आणि विविध वैभवशाली इमारतींसारखी अनेक मोठी विकासकामे मार्गी लावली आहेत. शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव हे संगमनेर शहराचे कायमचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मागील एका वर्षात शहरात अशांतता निर्माण झाली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी काळात संगमनेरमध्ये विकासासोबतच शांतता आणि बंधुभाव वाढीस लागेल, यासाठी संगमनेर सेवा समिती काम करेल, असा विश्वास लोकनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबा यांचे दर्शन घेऊन सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला, त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, निवडणूक संपल्यावर आम्ही कधीही विरोधकांमध्ये भेदभाव केला नाही, सर्वांना बरोबर घेतले. त्यामुळे संगमनेरमध्ये सुसंस्कृत राजकारणाची आदर्श परंपरा निर्माण झाली आहे. तसेच, दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने केलेल्या चांगल्या कामामुळे कचरा व्यवस्थापनासह अनेक योजना मार्गी लागल्या आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिके मिळाली. 

थोरात यांनी शहरातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. मागील एक वर्षापासून संगमनेर शहर अस्वस्थ झाले आहे आणि ही चिंता सर्व नागरिकांमध्ये आहे. आपल्याला आपली परंपरा जपायची आहे, संस्कृती जपायची आहे, आपले शहर जपायचे आहे. त्यामुळेच संगमनेरकर म्हणून सर्व नागरिक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत, असे आवाहन त्यांनी केले. सर्व उमेदवार संगमनेरची परंपरा जपत चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेतला आणि ‘आय लव संगमनेर’ या सेल्फी पॉइंटसमोर सर्व नागरिकांसमवेत फोटो घेतला. याप्रसंगी शिवसेनेचे अमर कतारी, उमेदवार कविता अमर कतारी, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, पप्पू नेहुलकर, प्रकाश कलंत्री, काशिनाथ आडेप, राजाभाऊ अवसक, दत्तात्रय थोरात, आकाश जेधे, लखन जेधे, सूरज बागे, सागर बागे, शुभम परदेशी, ललित शिंपी, मयूर जाधव, अंकित परदेशी, विशाल भोईर, भगवान घोडेकर, वेणू गोपाल कलंत्री, सतीश आडेप, गोविंद नागरे, किरण हासे, बाळासाहेब गुंजाळ, शंभू जवरे, गौरव जेधे, हर्षल जेधे, अल्ताफ शेख, रोहित वाळके यांच्यासह विविध पदाधिकारी आणि तरुण-युवकांची मोठी गर्दी उपस्थित होती.

तरुण व युवकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी सेल्फीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याभोवती गराडा घातला. संगमनेरी सेवा समितीच्या उमेदवारांसाठी मतदारांमधील मोठा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 816
नगरपरिषद निवडणूक प्रचार शुभारंभ बाळासाहेब थोरात संगमनेर सेवा समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.