Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार तालुक्याचा श्वास असणाऱ्या संगमनेरला गुन्हेगारीचे ग्रहण, ड्रग्ज, हुक्का, हप्तेखोरी; संगमनेरच्या प्रगतीसाठी अपप्रवृत्तींचा बिमोड करा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
शेती व सहकार

सहकार तालुक्याचा श्वास असणाऱ्या संगमनेरला गुन्हेगारीचे ग्रहण, ड्रग्ज, हुक्का, हप्तेखोरी; संगमनेरच्या प्रगतीसाठी अपप्रवृत्तींचा बिमोड करा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

माजी आमदार तांबे म्हणाले, पतसंस्था चळवळीमुळे शेतकरी माणसाला मोठी मदत झाली असून सुभाष चंद्र बोस पतसंस्थेने सातत्याने चांगलं काम केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

सहकार हा संगमनेर तालुक्याचा श्वास राहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसात तालुक्याचे सहकार समृद्धीची घडी विस्कटक चालली असून तालुक्यात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील शांतता व समृद्धी कायम राखण्यासाठी या गैर अपप्रवृत्तींचा सर्वांनी एकत्र येऊन बीमोड करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

हंगेवाडी (संगमनेर) येथे सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने थोरात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शरद नाना थोरात, आर. बी. राहणे, राजेंद्र चकोर, दिलीप नागरे, प्रतीक सांगळे, रमेश सांगळे, दीपक कांगणे, सरपंच श्रीमती कमल कांगणे, सिताराम वर्पे, मीनानाथ वर्पे, नारायण नागरे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमनेर तालुक्याच्या योगदानात सहकाराचे महत्व अधोरेखित करताना थोरात यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व भाऊसाहेब थोरात यांच्या योगदानामुळे सहकार चळवळ रुजल्याचे सांगितले. यामुळेच तालुक्यात आर्थिक समृद्धी आली आहे. तालुक्यातील पतसंस्थांमध्ये सुमारे २००० कोटींच्या ठेवी असून, सहकार हा या भागाचा श्वास आहे, असे थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी गणपतराव सांगळे यांच्या नेतृत्वाखालील सुभाषचंद्र बोस पतसंस्थेचे काम पारदर्शक आणि उत्कृष्ट असल्याबद्दल गौरवोद्गार काढले.

निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केली त्यामुळे तालुक्यामध्ये चांगले पाणी आले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे सांगताना सत्ता येते आणि जाते मात्र तरुण पिढीचे भविष्य आपण जपले पाहिजे असे सांगत, थोरात यांनी यावेळी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांवर सखोल भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या तालुक्यात मारहाण, अमली पदार्थांची तस्करी, आणि वाळू-मुरुमाच्या जोरावर होणारी दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ड्रग्स, हुक्का, नशीली पदार्थ संगमनेरमध्ये मिळत आहेत. 

संगमनेर बस स्थानकावर विरोधकांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व करणारा एक पुढारी या रॅकेटचा चालक आहे. हे लोक संगमनेर तालुक्यात आले कसे? यांना कुणाचा वरदहस्त आहे? असा सवाल उपस्थित करत या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींमागील कारणांची मीमांसा करताना त्यांनी फोफावलेल्या हप्तेखोरीवर बोट ठेवले. 

तालुक्याची चांगली परंपरा व शांतताप्रिय ओळख जपण्यासाठी थोरात यांनी पोलिसांनी या वाईट गोष्टी वेळीच रोखल्या पाहिजेत, अशी थेट मागणी केली. तसेच, तालुक्यात घुसू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींचा सगळ्यांनी मिळून बिमोड करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले.

माजी आमदार तांबे म्हणाले, पतसंस्था चळवळीमुळे शेतकरी माणसाला मोठी मदत झाली असून सुभाष चंद्र बोस पतसंस्थेने सातत्याने चांगलं काम केले आहे. यावेळी रणजीतसिंह देशमुख यांचे देखील भाषण झाले. प्रास्ताविक गणपतराव सांगळे यांनी केले तर प्रतीक सांगळे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील शेतकरी नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब थोरात व मान्यवरांची यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 444
बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.