Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रणसंग्राम तापला! भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी; पक्षाकडून तातडीने निष्कासन!
राजकारण

रणसंग्राम तापला! भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी; पक्षाकडून तातडीने निष्कासन!

थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी करण्याचे मोठे धाडस मेघा भगत यांनी दाखविले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर नगरपालिका निवडणुकीत ऐनवेळी मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ आला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचे कारण देत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी नगरसेविका मेघा दीपक भगत यांनी थेट बंडखोरी केली आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली असून, पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे.

भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी ही कारवाई केली आहे. भगत यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असताना पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवत, त्यांना तात्काळ पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे नितीन दिनकर यांचे अधिकृत पत्र समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे.

मेघा भगत या भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. मावळत्या (आधीच्या) नगरपालिकेत त्या भाजपच्या एकमेव विरोधी महिला नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली होती.

मात्र, महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाने ही मागणी डावलली. आमदार अमोल खताळ यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या भावजयी सुवर्ण खताळ यांची उमेदवारी निश्चित केली. यामुळे नाराज झालेल्या मेघा भगत यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात जात बंडखोरीचा पवित्रा घेतला आणि आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

खताळ यांच्याकडून उमेदवारी डावलली गेल्याने पक्षांतर्गत अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु, थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी करण्याचे मोठे धाडस मेघा भगत यांनी दाखविले.

भगत यांच्या या बंडखोरीचे पडसाद आता पक्षांतर्गत जोरदार उमटले असून, भाजपला शिस्तभंगाच्या कारवाईतून आपला कठोर संदेश द्यावा लागला आहे. या कारवाईमुळे आता संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घडामोडीवर भाजप आणि बंडखोर उमेदवाराची पुढील प्रतिक्रिया काय असेल, यावर संगमनेरच्या राजकारणात लक्ष लागून राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,024
नगरपरिषद निवडणूक निलंबन बंडखोरी भाजप मेघा भगत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.