Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘दडपशाही’चा नवा अध्याय: संगमनेरात विरोधकांच्या सभेला जागा नाकारल्याने राजकीय वातावरण तापले! – निष्पक्ष निवडणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह
निवडणूक

‘दडपशाही’चा नवा अध्याय: संगमनेरात विरोधकांच्या सभेला जागा नाकारल्याने राजकीय वातावरण तापले! – निष्पक्ष निवडणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह

माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया देत, हा 'राजकीय दडपशाहीचा नवा अध्याय' असल्याचे म्हटले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (भाजप-शिंदे गट) सभेसाठी जागा आरक्षित करण्याच्या नावाखाली, संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांसाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक जागा नाकारल्याचा गंभीर आरोप सेवा समितीने केला आहे. सभांसाठीच्या या जागा ‘ब्लॉकिंग’च्या धक्कादायक घडामोडींमुळे प्रशासनावर राजकीय ‘दबाव’ असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात होतील का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सेवा समितीने २७ नोव्हेंबर रोजी नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने महायुतीच्या प्रचारासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नियोजित असल्याने ही मागणी थेट नाकारली.

परंतु, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, २७ नोव्हेंबरसह २८ नोव्हेंबरची तारीखही महायुतीकडून ‘ब्लॉक’ केल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. विशेषतः, २८ तारखेला महायुतीची कोणतीही सभा नसतानाही ही जागा रोखून ठेवल्यामुळे, सेवा समितीला मैदान मिळू नये हाच एकमेव हेतू असल्याचा संशय नागरिक व राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

सेवा समितीने प्रशासनाकडे २८ नोव्हेंबरला जागा रिकामी असल्यास परवानगी देण्याची विनंती केली होती, पण ‘जागा मिळणार नाही,’ असे रूक्ष उत्तर प्रशासनाने दिल्याचे समितीचे म्हणणे आहे.

या सर्व घडामोडींवरून प्रशासनावर प्रचंड राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकांपूर्वीच जागा अडवून निवडणूक वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याची नाराजी शहरात उघडपणे व्यक्त होत आहे.

‘दडपशाही’चा आरोप: माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांचा थेट हल्लाबोल – माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया देत, हा ‘राजकीय दडपशाहीचा नवा अध्याय’ असल्याचे म्हटले आहे. संगमनेर सेवा समितीला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभेची जागा अडवून जनता थांबेल असे त्यांना वाटते, पण जनतेच्या मनात असलेली आमची जागा कुणीही अडवू शकत नाही. संगमनेरच्या राजकारणात अशा प्रकारची राजकीय दडपशाही कधीच नव्हती. याला येथील सुज्ञ जनता निश्चितच योग्य उत्तर देईल.

इतर मैदानांवरही प्रशासनाचा ‘वेट ॲण्ड वॉच’ – प्रशासनाने नवीन नगर रोड येथील जागा नाकारल्यानंतर सेवा समितीने शहराच्या इतर मैदानांसाठीही अर्ज केले. मात्र, प्रशासनाने त्यावरही अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे महायुतीच्या सत्तेच्या दबावापुढे प्रशासनाने नमते घेतल्याचे चित्र निर्माण झाले असून, निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहरभर जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 748
नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा संगमनेर सेवा समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.