संगमनेर –
श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या संगमनेर शाखेला दिलेला धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी न्यायालयाने विजू शांताराम नवले (रा. मालदाड, ता. संगमनेर) या आरोपीला दोषी ठरवले आहे. न्यायदंडाधिकारी सी. पी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने आरोपीला दोन महिने साधा कारावास आणि चेक रक्कम अधिक वीस हजार रुपये दंड भरण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
न्यायालयाने आरोपीला चेक रक्कम आणि दंड अशी एकूण रक्कम एका महिन्याच्या आत फिर्यादी कंपनीस देण्याचे निर्देश दिले आहेत. जर आरोपीने या मुदतीत दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अतिरिक्त वीस दिवस साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोपी विजू शांताराम नवले यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर येथून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या हप्त्यापोटी आरोपीने कंपनीला धनादेश दिला होता. मात्र, सदर धनादेश अनादरीत झाल्यानंतरही आरोपीने कायदेशीर मुदतीत चेकची रक्कम परतफेड केली नाही. त्यामुळे, कंपनीने आरोपीविरुद्ध धनादेश अनादरण केल्याप्रकरणी कलम १३८ नुसार न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्यात, चौथे वरिष्ठ व अतिरिक्त न्यायदंडाधिकारी सी. पी. रघुवंशी यांनी गुणदोषांवर निकाल देत, आरोपीला दोषी ठरवून उपरोक्त शिक्षा सुनावली. या खटल्यात फिर्यादी कंपनीच्या वतीने ॲड. राजू बबनराव खरे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांना ॲड. विजय देवगिरे, ॲड. सुहास गोर्डे, आणि ॲड. सुमय्या सय्यद यांनी कायदेशीर सहाय्य केले.
संगमनेर न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीला दोन महिने कारावास आणि दंड
कंपनीने आरोपीविरुद्ध धनादेश अनादरण केल्याप्रकरणी कलम १३८ नुसार न्यायालयात खटला दाखल केला होता.





संगमनेर – 
आरोपी विजू शांताराम नवले यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड,
