Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या संस्कार-बालभवनची राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी! लोकनृत्यात सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक; विविध राज्यातील स्पर्धकांवर वर्चस्व
क्रिडा व कला

संगमनेरच्या संस्कार-बालभवनची राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी! लोकनृत्यात सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक; विविध राज्यातील स्पर्धकांवर वर्चस्व

उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर या सर्व नृत्यांगणांनी रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कल्चर फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत संगमनेरच्या संस्कार-बालभवनच्या नृत्यांगणांनी नेत्रदीपक यश संपादन करत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. पारंपरिक भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकारांवर आधारित या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, ओडिशा, केरळ अशा विविध राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, संस्कार-बालभवनची विद्यार्थिनी वेदीका हासे हिने उत्कृष्ट लोकनृत्य सादर करत ज्युनिअर गटात सुवर्णपदकासह पहिला क्रमांक पटकावून संगमनेरचे नाव उंचावले. याव्यतिरिक्त, इतर दोन्ही गटांमध्ये रौप्यपदकासह दुसरे स्थान मिळवत बालभवनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली.
देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन- भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्रातील प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कल्चर फौंडेशनच्यावतीने या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील अहिल्यानगर, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती यांसारख्या महानगरांसह राजस्थान, गुजराथ, ओडिशा, केरळ अशा अनेक राज्यांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या प्रादेशिक संस्कृतीचे आणि परंपरांचे सुंदर प्रतिबिंब नृत्यातून दाखवले.
शास्त्रीय नृत्यातही छाप- लोकनृत्याप्रमाणेच, शास्त्रीय नृत्यप्रकारातही बालभवनच्या नृत्यांगणांनी प्रभावी कामगिरी केली. भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात, बालभवनच्या संघाने उप-ज्युनिअर आणि ज्युनिअर या दोन्ही गटांमध्ये रौप्यपदकासह दुसरे स्थान मिळवले.✨ उप-ज्युनिअर गट: तृषा वेडे, कृष्णा गुळवे, सिया पाचोरे, देविका टकले, शांभवी कलंत्री.
✨ ज्युनिअर गट: आर्या पाटील, पूर्वा पवार, आदिश्री इंदाणी, उन्नती जैन, आणि मीनल झंवर.
उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर या सर्व नृत्यांगणांनी रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
कल्चर फौंडेशनचे संचालक कुणाल आनंदम् आणि प्रकल्प प्रमुख कुलदीप कागडे यांनी स्पर्धेचे संचालन केले. प्रशिक्षकाची भूमिका विशाल भोकरे आणि सोनाली महापात्रा यांनी यशस्वीपणे पार पाडली. या भरीव यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी आणि सचिव गिरीश डागा यांनी सर्व नृत्यांगणांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 648
नृत्य स्पर्धा संस्कार बालभवन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.