Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिका निवडणूक! उर्वरित 3 जागांचे चित्र स्पष्ट, तांबे विरुद्ध खताळ यांच्या प्रतिष्ठेची लढाई, माघारीमुळे 1 ‘सरळ’ लढत; 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला कळणार ‘पालिका’ कोणाच्या हातात!
निवडणूक

संगमनेर पालिका निवडणूक! उर्वरित 3 जागांचे चित्र स्पष्ट, तांबे विरुद्ध खताळ यांच्या प्रतिष्ठेची लढाई, माघारीमुळे 1 ‘सरळ’ लढत; 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला कळणार ‘पालिका’ कोणाच्या हातात!

दोन्ही आमदारांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली असून, पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2025Updated:11/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेर नगर परिषदेच्या 15 प्रभागांमधील 30 जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीतील प्रभाग 1 ब, 2 ब, 15 ब या उर्वरित तीन जागांसाठीचे निवडणूक चित्र बुधवारी संध्याकाळी अखेर स्पष्ट झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या या जागांसाठी आता शनिवारी, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने लढतींचे स्वरूप निश्चित झाले आहे. यात प्रभाग 1 ब मधून लोंढे संकेत सुभाष, तर प्रभाग 15 ब मधून शेख रेहाना सिराजोद्दीन आणि सईदा गफ्फार शेख यांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग 2 ब मधून मात्र कोणीही माघार घेतली नाही.
माघारीनंतर उर्वरित तीन जागांवर खालीलप्रमाणे लढती होणार आहेत – 
प्रभाग 1 ब मध्ये सरळ लढत होत असून ही लढत सर्वात लक्षवेधी ठरणार असून, संगमनेर सेवा समितीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अभिजीत पुंड यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे.
प्रभाग 2 ब मध्ये चौरंगी लढत होत असून या जागेवर चार महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात संगमनेर सेवा समितीच्या दिघे अर्चना सुभाष, शिवसेना शिंदे गटाच्या इंदिरा शशांक नामन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या म्हस्के सुवर्णा दत्तात्रेय आणि अपक्ष उमेदवार सुजाता महेश ऐनगंदुल यांचा समावेश आहे.
प्रभाग 15 ब मध्ये तिरंगी लढत होत असून या महिला राखीव जागेवर संगमनेर सेवा समितीच्या पठाण नसीमबानो इसहाकखान यांची लढत अपक्ष उमेदवार पठाण जुलेखा निसारखान व शेख दिलशाद अजीज यांच्याशी होत आहे.
प्रतिष्ठेची लढाई: तांबे विरुद्ध खताळ! – या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून, तर आमदार अमोल खताळ यांनी शिवसेना-भाजपकडून उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही आमदारांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली असून, पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
दरम्यान, 2 डिसेंबरला 27 जागांची आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर, आता या सर्व जागांचा अंतिम निकाल प्रशासनाने निश्चित केलेल्या तयारीनुसार 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निकालातून कोणता आमदार ‘सरस’ ठरतो आणि संगमनेर नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते, हे स्पष्ट होणार आहे. तूर्तास तरी नियोजनबद्धरीत्या तांबे यांच्या पॅनेलने आघाडी घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पालिका कोणाच्या ताब्यात? हे 21 डिसेंबरला ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,366
संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.