Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर आगारात ‘शिवनेरी’ आणि विनावाहक बसेसला मिळणार थांबा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्र्यांनी दिले निर्देश
राजकारण

संगमनेर आगारात ‘शिवनेरी’ आणि विनावाहक बसेसला मिळणार थांबा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्र्यांनी दिले निर्देश

संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेर उतरावे लागत होते आणि तिथून त्यांना मोठा त्रास सहन करत शहरात यावे लागत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

संगमनेर आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्यांना थांबा देण्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय आणि पायपीट आता थांबणार आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातून नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कामांसाठी पुणे व नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्या संगमनेर शहरात प्रवेश न करता थेट बाह्यवळण मार्गाने पुढे जात होत्या. त्यामुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेर उतरावे लागत होते आणि तिथून त्यांना मोठा त्रास सहन करत शहरात यावे लागत होते.

प्रवाशांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदार अमोल खताळ यांनी थेट नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. त्यांनी या प्रमुख मागणीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांना लेखी निवेदन सादर केले होते.

आमदार खताळ यांच्या मागणीची आणि प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेतली. त्यांनी तत्काळ शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्यांना संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

या महत्त्वाच्या निर्णयामुळे संगमनेरमधील हजारो नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 421
अमोल खताळ प्रताप सरनाईक शिवनेरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.