Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्यामुक्त तालुक्यासाठी संगमनेरात सोमवारी ‘जन आक्रोश मोर्चा’, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी; युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन
आंदोलन

बिबट्यामुक्त तालुक्यासाठी संगमनेरात सोमवारी ‘जन आक्रोश मोर्चा’, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी; युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन

बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा 'जन आक्रोश मोर्चा' अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/12/2025Updated:14/12/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) –

संगमनेर तालुका बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे भयभीत झाला असून, नरभक्षक बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी, (१५ डिसेंबर) २०२५ संगमनेरात भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली.

सोमवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय यादरम्यान हा जन आक्रोश मोर्चा हजारो संगमनेर करांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना जखमी व्हावे लागले आहे, तर शनिवारी संध्याकाळी जवळेकडलग येथील लहानग्या सिद्धेशला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत वारंवार मागणी करूनही सरकार आणि वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ‘बिबट्यामुक्त संगमनेर तालुका’ या मागणीसाठी हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

बिबट्या हटाव आंदोलन समितीच्या वतीने डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तालुक्यातील तमाम जनता, महिला, युवक आणि शेतकऱ्यांनी या निर्णायक लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे. बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा ‘जन आक्रोश मोर्चा’ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 696
आंदोलन जन आक्रोश मोर्चा जवळे कडलग बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.