Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आई गेली, बाळ राहिले: सिझेरियननंतर २२ वर्षीय मातेचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणाचा गंभीर आरोप प्रसूतीचा आनंद ठरला शोकाकुल! आदिवासी विवाहितेचा सिझेरियननंतर दुर्दैवी मृत्यू; डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप
आरोग्य

आई गेली, बाळ राहिले: सिझेरियननंतर २२ वर्षीय मातेचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणाचा गंभीर आरोप प्रसूतीचा आनंद ठरला शोकाकुल! आदिवासी विवाहितेचा सिझेरियननंतर दुर्दैवी मृत्यू; डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

एका बाजूला नवजात बाळाच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आईच्या निधनाचे दु:ख अशी भीषण परिस्थिती या कुटुंबावर ओढवली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोले शहरात घडली आहे. विशेष म्हणजे बाळ सुखरूप असले तरी, प्रसूतीच्या आनंदाऐवजी या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली असून, नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर उपचारात घोर हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे.

रुपाली विठ्ठल गोधडे (रा. आश्वी खुर्द, संगमनेर) असे मृत मातेचे नाव आहे. प्रसूतीसाठी त्या माहेरी आल्या होत्या. गर्भधारणेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ सुखरूप जन्माला घातले. मात्र, त्यानंतर रुपाली यांची प्रकृती अचानक खालावली.

प्रकृती अत्यंत गंभीर बनल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने पुढील उपचारांसाठी रुपाली यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय (लोणी) येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, लोणी येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली यांना मृत घोषित केले.

रुपाली यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सासर आणि माहेरच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपाली यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘रुपाली यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांनी उपचारांत निष्काळजीपणा केला. वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्यानेच रुपालीचा मृत्यू झाला’, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुपाली यांचे कुटुंबीय अत्यंत गरीब आदिवासी समाजातील आहे. बाळंतपणाच्या आनंदाच्या क्षणाची वाट पाहणाऱ्या या कुटुंबावर कर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला नवजात बाळाच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आईच्या निधनाचे दु:ख अशी भीषण परिस्थिती या कुटुंबावर ओढवली आहे.

नातेवाईकांच्या गंभीर आरोपांमुळे, आता आरोग्य विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक बनले असल्याने आरोग्य विभाग काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,242
बाळंतपण महिलेचा मृत्यू सिझेरियन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.