Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर जवळे कडलगच्या क्रूर बिबट्याला ‘डार्ट’ने केले जेरबंद; वनविभागाची यशस्वी मोहीम
महाराष्ट्र संवाद विशेष

अखेर जवळे कडलगच्या क्रूर बिबट्याला ‘डार्ट’ने केले जेरबंद; वनविभागाची यशस्वी मोहीम

पकडलेला बिबट्या सिध्देशवर हल्ला करणारा तोच आहे का, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. वैद्यकीय तपासणीनंतर याची निश्चिती होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे चार वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. शनिवारी (दि. १३) या बिबट्याच्या हल्ल्यात सिध्देश कडलग या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संतप्त ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनामुळे वनविभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती आणि अखेर रविवारी (दि. १४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जाळ्यात अडकला.

शनिवारी बिबट्याने हल्ला करून सिध्देशचा बळी घेतल्यामुळे जवळे कडलगसह संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे रेस्क्यू टीमसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक तसेच नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी संगमनेरच्या वनविभागाला तातडीने बिबट्याला पकडण्याचे आदेश दिले. ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम तीव्र करण्यात आली. शनिवारी रात्री ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध सुरू होता. रात्रभर आणि रविवारी सकाळीही शोध घेतल्यानंतर पायाचे ठसे आणि ड्रोनच्या निरीक्षणातून बिबट्या नदीच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली.

रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला घेरले. सावज टप्प्यात येताच बेशुद्धीचे इंजेक्शन (Dart) मारून बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या टीमला मोठे यश आले. पकडलेला बिबट्या दोन ते तीन वर्षे वयाचा असून, तो नर जातीचा आहे. त्याला पिंजऱ्यात ठेवून सध्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.

सहाय्यक वनरक्षक अमरजीत पवार यांनी माहिती दिली की, नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली होती. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वीच तो पकडण्यात आला आहे.

बिबट्या पकडला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. तसेच, पकडलेला बिबट्या सिध्देशवर हल्ला करणारा तोच आहे का, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. वैद्यकीय तपासणीनंतर याची निश्चिती होणार आहे. वनक्षेत्रपाल सागर केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोका टाळण्यासाठी जवळे कडलग परिसरात इतरही बिबट्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम रविवारी दिवसभर आणि रात्रीही सुरू होती. ही शोध मोहीम सोमवारी रात्रीही सुरू ठेवण्यात आली आहे.


🌟 अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा करून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवल्याचे सांगितले.

🌟 माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही वनमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याचे आणि त्यामुळे परवानगी मिळाल्याचे सांगितले.

🌟 आमदार अमोल खताळ यांनी आपण पालकमंत्री, वनमंत्री व संबंधितांशी चर्चा करून बिबट्याला ठार मारण्याची विनंती केली होती, त्यानुसार परवानगी मिळाल्याचे स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 777
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar27/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पारेगाव बुद्रुक…

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.