Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये थोरात-तांबे जोडीचा डंका! रद्द झालेल्या १५ किमी रस्ते कामांना पुन्हा खेचून आणली मंजुरी… संघर्षाला मोठे यश
राजकारण

संगमनेरमध्ये थोरात-तांबे जोडीचा डंका! रद्द झालेल्या १५ किमी रस्ते कामांना पुन्हा खेचून आणली मंजुरी… संघर्षाला मोठे यश

एका अनपेक्षित निर्णयाद्वारे शासनाने या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली होती. विकासकामांना मिळालेली स्थगिती आणि त्यानंतर रद्द झालेली मंजुरी यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात मंजूर झालेली आणि नंतर राजकीय कारणास्तव रद्द करण्यात आलेली रस्ते कामे पुन्हा मार्गी लागली आहेत. एकूण ३०.५७० किलोमीटरपैकी १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना राज्य सरकारने नव्याने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील चार मोठ्या ग्रामीण भागांतील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.
राजकीय वळणांनंतर कामांना पुन्हा संजीवनी– लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील ८ महत्त्वाचे रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र, ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका अनपेक्षित निर्णयाद्वारे शासनाने या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली होती. विकासकामांना मिळालेली स्थगिती आणि त्यानंतर रद्द झालेली मंजुरी यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत होता.
आमदार सत्यजीत तांबे यांनी ही बाब गांभीर्याने घेत ग्रामविकास मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी वैयक्तिक भेट घेऊन या रस्त्यांचे महत्त्व पटवून दिले. अखेर शासनाने १४ नोव्हेंबर रोजी नवीन आदेश काढून ४ मुख्य रस्त्यांना पुन्हा मान्यता दिली आहे.
या ४ रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा– पुन्हा मंजुरी मिळालेल्या १५ किलोमीटरच्या कामांमध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे:
डिग्रस – रणखांबवाडी
मिर्झापूर – धांदरफळ खुर्द
साकुर – बिरेवाडी
तासकरवाडी – खंडेरायवाडी

उर्वरित १५ किलोमीटरसाठी लढा सुरूच राहणार- लोकांच्या सोयीसाठी मंजूर झालेली कामे रद्द करणे विकासविरोधी होते. आम्ही मंत्र्यांकडे वस्तुस्थिती मांडली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, अद्याप उर्वरित १५ किलोमीटरची कामे (चिखली, खरशिंदे, पारेगाव आणि शिंदोडी परिसर) प्रलंबित आहेत. ही कामे देखील मंजूर होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.– सत्यजित तांबे, आमदार

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,030
मंजुरी रस्ते कामे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.