Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरला राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान; ७०० हून अधिक खेळाडूंच्या उपस्थितीत रंगणार ‘योगासन नगरी’
क्रिडा व कला

संगमनेरला राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान; ७०० हून अधिक खेळाडूंच्या उपस्थितीत रंगणार ‘योगासन नगरी’

संगमनेरमध्ये विकसित झालेला ‘स्पर्धा आयोजन पॅटर्न’ हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशस्त क्रीडा संकुले, निवासाच्या उत्तम सोयी आणि विस्तीर्ण प्रांगण या जमेच्या बाजूंमुळेच राष्ट्रीय स्तरावरील यजमानपद संगमनेरला मिळाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
जिल्हा आणि राज्यस्तरीय योगासन स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिल्यानंतर, संगमनेर शहराच्या शिरपेचात आता मानाचा राष्ट्रीय तुरा रोवला गेला आहे. आगामी २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत संगमनेरमध्ये सहाव्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर व सिनिअर ‘बी’ योगासन क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 
योगासन भारत आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेसाठी संगमनेर सज्ज झाले असून, ध्रुव ग्लोबल स्कूलमधील क्रीडा संकुलात हा योगसाधनेचा महाकुंभ भरणार असल्याची माहिती योगासन भारतचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.
पाच दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवासाठी देशातील २८ राज्यांमधून ७०० हून अधिक नामांकित योगासनपटू, त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावरील संघटनांचे पदाधिकारी संगमनेरमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व पाहुण्यांच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विस्तीर्ण परिसरात करण्यात आली आहे. 
स्पर्धेच्या निमित्ताने शाळेच्या परिसराला आता एका भव्य ‘योगासन नगरी’चे स्वरूप प्राप्त झाले असून, संपूर्ण परिसर क्रीडाप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
केंद्र सरकारने भारतीय पारंपरिक योगासनांना अधिकृत खेळाचा दर्जा दिल्यानंतर, तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. संगमनेरने यापूर्वी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये दाखवलेली शिस्त, नेटके नियोजन आणि एकाच वेळी विविध ठिकाणी स्पर्धा घेण्याची उपलब्ध असलेली आधुनिक यंत्रणा, यामुळे राष्ट्रीय स्तरावरील निवडीत संगमनेरने बाजी मारली आहे.
या स्पर्धेच्या नियोजनाबाबत बोलताना स्पर्धा व्यवस्थापक कुलदीप कागडे म्हणाले की, संगमनेरमध्ये विकसित झालेला ‘स्पर्धा आयोजन पॅटर्न’ हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशस्त क्रीडा संकुले, निवासाच्या उत्तम सोयी आणि विस्तीर्ण प्रांगण या जमेच्या बाजूंमुळेच राष्ट्रीय स्तरावरील यजमानपद संगमनेरला मिळाले आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, प्रत्येक विभागाचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. आगामी पाच दिवसांत संगमनेरची ही भूमी खऱ्या अर्थाने योगाच्या ऊर्जेने न्हाऊन निघणार आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 492
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन योगासन भारत योगासन स्पर्धा राष्ट्रीय योगासन स्पर्धा संजय मालपाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.