Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षणाची नवी क्रांती! लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ९ अद्यावत अभ्यासिका साकारणार, राजापूर येथे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते अभ्यासिकेचे भूमिपूजन; वाचन संस्कृती आणि करिअरला मिळणार बळ
शिक्षण

शिक्षणाची नवी क्रांती! लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ९ अद्यावत अभ्यासिका साकारणार, राजापूर येथे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते अभ्यासिकेचे भूमिपूजन; वाचन संस्कृती आणि करिअरला मिळणार बळ

तालुक्यातील नऊ महत्त्वाच्या गावांमध्ये या अभ्यासिकांचे काम सुरू होणार असून, राजापूर येथील केंद्रामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत ‘संगमनेर मॉडेल’ राज्यासमोर ठेवणारे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने ९ अद्यावत अभ्यासिका उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. 

या उपक्रमाचा शुभारंभ म्हणून राजापूर येथे ग्रामविकास २५१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३० लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या अभ्यासिकेचे भूमिपूजन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार ही ओळख जपत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आदर्श बनवले आहे. आज संगमनेर हे अद्यावत शिक्षणाचे केंद्र बनले असून, ग्रामीण भागातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी शहरात जावे लागू नये, यासाठी ही ‘अद्यावत अभ्यासिका’ संकल्पना राबवण्यात येत आहे. 

तालुक्यातील नऊ महत्त्वाच्या गावांमध्ये या अभ्यासिकांचे काम सुरू होणार असून, राजापूर येथील केंद्रामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यास आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना रामहरी कातोरे यांनी सांगितले की, शिक्षणातूनच समृद्धी येते आणि हीच दृष्टी समोर ठेवून लोकनेते थोरात यांनी विविध शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून सध्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय येथेही अद्यावत लायब्ररी सुरू असून, ग्रामीण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या भूमिपूजन प्रसंगी रामहरी कातोरे, संतोष हासे, माधव हासे, लतिका गायकर, कुसुमताई पानसरे, बाबासाहेब गायकर, सोमनाथ हासे, संजय हासे, प्रदीप हासे, अजय हासे, रावसाहेब खतोडे, राजेंद्र खैरनार, विनीत खतोडे, रमेश जाधव, शैला हासे, राजश्री घोलप, जयश्री हासे, मनीषा हासे, देवराम हासे, आनंदा हासे, प्रशांत तिकांडे, बाळासाहेब बर्डे, भास्कर मोहिते, अविनाश शेलकर, भारत हासे, सुशांत हासे, राहुल गायकर, संभाजी हासे, विकास हासे, अमोल साळुंके यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप हासे यांनी केले तर आभार रावसाहेब खतोडे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 370
अभ्यासिका जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

25/07/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या…

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.