Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “इनको बाहर खिचो और मारो” अशा चिथावणीखोर घोषणा देत विजयी मिरवणुकीचा रक्तरंजित राडा! संगमनेरात नवनिर्वाचित नगरसेवकाच्या समर्थकांकडून कुटुंबाला बेदम मारहाण; १७ जणांवर गुन्हे दाखल
गुन्हेगारी

“इनको बाहर खिचो और मारो” अशा चिथावणीखोर घोषणा देत विजयी मिरवणुकीचा रक्तरंजित राडा! संगमनेरात नवनिर्वाचित नगरसेवकाच्या समर्थकांकडून कुटुंबाला बेदम मारहाण; १७ जणांवर गुन्हे दाखल

घटनेच गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/12/2025Updated:23/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच भारतनगर भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.नवनिर्वाचित विजयी सदस्य नूर महंमद शेख यांची मिरवणूक सुरू असताना एका कुटुंबावर लोखंडी रॉड, चॉपर आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या खळबळजनक घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,२२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फिर्यादी रिक्षा चालक मुजीब शमशुद्दीन शेख (वय ४०, रा. भारतनगर, संगमनेर) हे आपल्या घरी असताना, यावेळी नवनिर्वाचित विजयी उमेदवार नूर महंमद शेख यांची मिरवणूक या भागातून जात होती. मिरवणूक फिर्यादींच्या घरासमोर आली असता, आरोपींनी अचानक घोषणाबाजी करत फिर्यादीला लक्ष केले.

इनको बाहर खिचो और मारो अशा चिथावणीखोर घोषणा देत आरोपींच्या टोळक्याने फिर्यादी मुजीब शेख, तसेच जोया, मेहरान, इशज आणि साद यांना घेराव घातला. हातातील लोखंडी रॉड, बेसबॉल स्टिक आणि धारदार चॉपरने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या १७ आरोपींवर गुन्हे दाखल-मुजीब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून यात सलीम हाजी शेख, नूर मोहम्मद शेख, इमरान गणी शेख, शैजाज सलीम शेख, दानिश सलीम शेख, सलमान सलीम शेख, वसीम अब्दुल रहमान शेख, उमेर अलीम हाजी, जमील अजीज पठाण, ययाखान समशेरखान पठाण, अदनान शाहिद शेख, जिशान शाहिद शेख, सरजील मोहम्मद शेख, अलीम हाजी शेख, नईम रहमान शेख, तलहा कलीम शेख व रिजवान उस्मान शेख यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलीस प्रशासनाची भूमिका- घटनेची गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ११०१/२०२५ बी.एन.एस. कलम ११८, १९१(१), १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), (३) नुसार गुन्हे नोंदवले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,636
गुन्हेगारी वाद विजयी मिरवणूक हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar14/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक राहील. कुटुंबाची साथ लाभेल…

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.