Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांची शास्तीकराच्या ओझ्यातून सुटका; आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांनी ‘अभय योजना’ सुरू!
राजकारण

संगमनेरकरांची शास्तीकराच्या ओझ्यातून सुटका; आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांनी ‘अभय योजना’ सुरू!

वर्षानुवर्षे थकीत असलेल्या कराचा भार यामुळे हलका होणार असून, विशेषतः ज्या नागरिकांच्या मालमत्ता अनधिकृत बांधकामांच्या कक्षेत होत्या, त्यांना या तांत्रिक सुधारणेचा मोठा लाभ मिळणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता याच विकासप्रक्रियेत भर घालत संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी एक मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आमदार तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर नगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी ‘अभय योजना’ अखेर सुरू झाली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना सुमारे २ कोटी रुपयांच्या शास्तीकरातून मुक्तता मिळणार आहे.

अधिवेशनातील आवाज आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट- नगरपरिषद कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर कराचा मोठा बोजा पडत होता. अनेकदा नागरिक शास्तीची रक्कम भरत असूनही ती घरपट्टीमध्ये समाविष्ट केली जात नव्हती, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हा तांत्रिक पेच सोडवण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशनात वारंवार आवाज उठवला. केवळ सभागृहात प्रश्न न मांडता, त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आणि शास्तीकर माफ करण्याची आग्रही मागणी केली होती.

तांत्रिक अडचणी दूर, २ कोटींची शास्ती माफी- आमदार तांबे यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून नगरपालिका कार्यक्षेत्रातील आयडब्ल्यूबीपी (IWBP) योजनेतील त्रुटी दूर करून आता अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संगमनेर नगरपालिकेत सुमारे २ कोटींची शास्ती करमाफी केली जाणार आहे. वर्षानुवर्षे थकीत असलेल्या कराचा भार यामुळे हलका होणार असून, विशेषतः ज्या नागरिकांच्या मालमत्ता अनधिकृत बांधकामांच्या कक्षेत होत्या, त्यांना या तांत्रिक सुधारणेचा मोठा लाभ मिळणार आहे.

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन- संगमनेर नगरपरिषद नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा आणि लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे. तांत्रिक अडचणींमुळे शास्तीकराचा जो बोजा नागरिकांवर होता, तो आता या अभय योजनेमुळे दूर झाला आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपला थकीत कर भरून शास्तीतून मुक्त व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 853
अभय योजना माफी शास्ती कर संगमनेर नगर परिषद सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.