Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भयंकर! आधी अपहरण, मग निर्घृण हत्या आणि मृतदेह जाळला; गिधे खून प्रकरणाचा गुंता सोडवत एलसीबीच्या पथकाने खुन्याला साथीदारासह संगमनेरमध्ये पकडले!
गुन्हेगारी

भयंकर! आधी अपहरण, मग निर्घृण हत्या आणि मृतदेह जाळला; गिधे खून प्रकरणाचा गुंता सोडवत एलसीबीच्या पथकाने खुन्याला साथीदारासह संगमनेरमध्ये पकडले!

सावध राहा! कुख्यात गुन्हेगार दीपक पोकळे अखेर जेरबंद; तुमच्याकडेही खंडणी मागितली असेल, तर तात्काळ पोलिसांशी साधा संपर्क!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज: विशेष क्राईम बातमी
अहिल्यानगर – 
राहाता शहरातून बेपत्ता झालेल्या सचिन कल्याणराव गिधे या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दीपक अंबादास पोकळे या सराईत गुन्हेगाराला संगमनेरमधून त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी जगतात पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १० डिसेंबर २०२५ रोजी सचिन गिधे हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे गेले असताना आरोपी प्रवीण वाघमारे याने त्यांच्या पत्नीला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. सचिन घरी न परतल्याने १५ डिसेंबर रोजी राहता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, फूरकान शेख, दीपक घाटकर, राहुल द्वारके, भीमराज खर्से, राहुल डोके, सुनील मालनकर, सतीश भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या तपास पथकाने सलग १५ दिवस तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींचा माग काढला.
दरम्यान, आरोपी दीपक पोकळे हा आपली ओळख लपवून पुणे, नाशिक, मुंबई आणि संभाजीनगर परिसरात वारंवार ठिकाणे बदलत होता. अखेर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील एका दगडाच्या खाणीत आरोपी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला वेढा घालून मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी दीपक पोकळे, गणेश दरेकर आणि प्रवीण वाघमारे यांनी हा खून केला असल्याचे चौकशीत समोर आले आहे. अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातून सचिन गिधे याचा खून करून मृतदेह टायर आणि डिझेलच्या साहाय्याने जाळून विल्हेवाट लावल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. मुख्य आरोपी दीपक पोकळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्का ,खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि जबरी चोरी यांसारखे १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल फोन असा एकूण १५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आवाहन या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस दलाचे कौतुक होत असून, आरोपी दीपक पोकळे याने जिल्ह्यात कोणाकडून खंडणी मागितली असल्यास किंवा कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी न घाबरता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे. पुढील तपास राहता पोलीस करत असून या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,959
अहिल्यानगर एलसीबी खून दीपक पोकळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.