Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठी साहित्याचा सन्मान! ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा; लेखकांनो तुमची पुस्तके पाठवा!
यश / निवड / पुरस्कार

मराठी साहित्याचा सन्मान! ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा; लेखकांनो तुमची पुस्तके पाठवा!

लेखकांनी पुस्तकासोबत कोणताही अर्ज, परिचय किंवा फोटो पाठवू नये, केवळ पुस्तकाच्या दोन प्रती पाठवणे पुरेसे आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

मराठी साहित्याचा गौरव करण्याची परंपरा जपत ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’च्या वतीने सन २०२६ सालासाठी विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यंदा कवितासंग्रह, गझल, कथा, कादंबरी, ललित, बालसाहित्य, विनोद, चरित्र आणि आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांसाठी एकूण १२ स्मृती पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्व. यशवंत चिंधू नेरे, स्व. विष्णूपंत माळोकार, स्व. सुंदर बोंगाळे, स्व. दिलीप दमाणे, स्व. रुक्मिणीबाई चवडेकर, शंकर घोरसे, स्व. भिमाई बाविस्कर, स्व. जयवंती तावडे, स्व. रत्नाबाई घोडके, स्व. शालिनी चिंचवडकर, ॲड. मदन फडणीस आणि स्व. पुष्पावती धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांचा समावेश आहे. साहित्य पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी १५०१/- रुपये रोख, १०००/- रुपयांची पुस्तके, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.

विशेष म्हणजे, या वर्षापासून मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्य संस्थेला ‘माधवराव कचवे स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्य संस्था पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी ३५०१/- रुपये रोख, १०००/- रुपयांची पुस्तके, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप ठेवण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी संबंधित संस्था किमान ५ वर्षांपूर्वीची आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असून, संस्थेचे मागील ३ वर्षांचे ऑडिट पूर्ण असावे तसेच संस्थेने राबविलेल्या उपक्रमांचे पुरावे प्रस्तावासोबत जोडणे गरजेचे आहे.

पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली (प्रथम आवृत्ती) पुस्तकेच विचारात घेतली जातील. साहित्य अनुवादित नसावे तसेच पुस्तकाच्या कोणत्याही पानावर काहीही लिहिलेले नसावे, अन्यथा पुस्तक अपात्र ठरेल. पुरस्कार निवडीचा अंतिम निर्णय ‘परीक्षक समिती’चा राहील. विजेत्या लेखकाला स्वतः उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणे बंधनकारक असून, अनुपस्थित राहिल्यास द्वितीय क्रमांकाच्या साहित्यिकाला संधी दिली जाईल. लेखकांनी पुस्तकासोबत कोणताही अर्ज, परिचय किंवा फोटो पाठवू नये, केवळ पुस्तकाच्या दोन प्रती पाठवणे पुरेसे आहे.

इच्छुक साहित्यिक व संस्थांनी आपली पुस्तके किंवा प्रस्ताव १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत ‘व्यंकटेशा कॉम्प्युटेक, शॉप नंबर ९, बनशंकरी नगर, म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर (फोन: 0217-2300040, मो: 9326612436)’ या पत्त्यावर पाठवावेत. पुरस्कार वितरणाची तारीख आणि स्थळ लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती मंचचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष दर्शन जोशी यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 266
पुरस्कार पुस्तके
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.