Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिबलापूर ग्रामपंचायतीचा संतापजनक कारभार! महापुरुषांच्या फोटोंची विटंबना अन् घंटागाडी धूळखात; व्हिडिओ पुराव्याने फुटले बिंग
महाराष्ट्र संवाद विशेष

शिबलापूर ग्रामपंचायतीचा संतापजनक कारभार! महापुरुषांच्या फोटोंची विटंबना अन् घंटागाडी धूळखात; व्हिडिओ पुराव्याने फुटले बिंग

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गटविकास अधिकारी (BDO) आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने चौकशी करावी, तसेच संबंधित ग्रामसेवक व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/01/2026Updated:09/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून एका गोदामात सडत पडली असतानाच, याच गोदामात आपल्या देशाच्या महापुरुषांचे फोटो अत्यंत विदारक आणि अपमानस्पद अवस्थेत फेकल्याचे समोर आले आहे. थेट व्हिडिओ पुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे निघाले असून संपूर्ण तालुक्यातून संतापाची लाट उसळली आहे.

गावातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये किमतीची घंटागाडी देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी नागरिकांच्या सेवेत येण्याऐवजी एका खासगी गोदामाची शोभा वाढवत आहे. गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना सरकारी मालमत्तेची अशी नासधूस होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे, ज्या गोदामात ही कचरा गाडी उभी आहे, तिथेच राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या तसबिरी (फोटो फ्रेम) अत्यंत अपमानस्पदरित्या अस्ताव्यस्त फेकलेल्या अवस्थेत आढळल्या. एकेकाळी भिंतीवर अभिमानाने असणारे हे फोटो आज जमिनीवर धुळीत पडलेले पाहून शिवप्रेमी आणि ग्रामस्थांच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत. ही केवळ प्रशासकीय चूक नसून महापुरुषांची मोठी विटंबना असल्याचे बोलले जात आहे.

काही सुज्ञ नागरिकांनी जेव्हा या बेजबाबदार कारभाराबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली, तेव्हा त्यांना उत्तरे देण्याऐवजी प्रशासनाकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आली. हे गंभीर प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी सतर्क नागरिकांनी केलेल्या चित्रीकरणामुळे हा सर्व काळा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. या व्हिडिओमध्ये कचरा गाडीची दुरवस्था आणि महापुरुषांच्या फोटोंची झालेली विटंबना स्पष्टपणे दिसून येत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2026/01/VID-20260108-WA0139.mp4

ज्या महापुरुषांच्या नावावर मते मागितली जातात, त्यांचेच फोटो गोदामात कचऱ्यासारखे फेकून देणाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गटविकास अधिकारी (BDO) आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने चौकशी करावी, तसेच संबंधित ग्रामसेवक व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 938
शिबलापूर ग्रामपंचायत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.