Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पिंपळे पाझर तलावातून दोन गावांसाठी पाणी सुटले; आमदार अमोल खताळ यांच्या तत्परतेने रब्बी पिकांना जीवदान
राजकारण

पिंपळे पाझर तलावातून दोन गावांसाठी पाणी सुटले; आमदार अमोल खताळ यांच्या तत्परतेने रब्बी पिकांना जीवदान

त्यांच्या या सूचनेनंतर प्रशासकीय यंत्रणेने हालचाली करत शुक्रवारी प्रत्यक्ष पाणी सोडले. यामुळे चिंचोली गुरव आणि पारेगाव येथील शेकडो एकर शेतीला जीवदान मिळणार असून पिकांचे नुकसान टळणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे पाणी शुक्रवारी (९ जानेवारी) सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्याची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव आणि पारेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चिंचोली गुरव व पारेगाव परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके सध्या पाणीअभावी धोक्यात आली होती. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रविदास सोनवणे आणि पारेगाव येथील भाजपचे सुरेश दळवी यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली होती.

आमदार खताळ यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपळे पाझर तलावातून रब्बीचे आवर्तन सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या या सूचनेनंतर प्रशासकीय यंत्रणेने हालचाली करत शुक्रवारी प्रत्यक्ष पाणी सोडले. यामुळे चिंचोली गुरव आणि पारेगाव येथील शेकडो एकर शेतीला जीवदान मिळणार असून पिकांचे नुकसान टळणार आहे.

पाणी सोडण्याच्या वेळी महायुतीचे पदाधिकारी, दोन्ही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी ऐन वेळी उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचे विशेष आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 824
अमोल खताळ पाणी पिंपळे पाझर तलाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.