संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘संगमनेर सेवा समिती’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी यांच्यासह सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी आज या नावांची अधिकृत घोषणा केली.
या निवडीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर २.० चा जाहीरनामा आणि शहराच्या विकासाचे एक विशेष व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती. यावर विश्वास ठेवून संगमनेरच्या ७० टक्के मतदारांनी सेवा समितीला मोठे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली असून कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड करणे ही एक मोठी कसरत होती.
निवड करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांना त्यांच्या संघटनात्मक कार्यासाठी पहिली संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दुसरे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी ज्येष्ठतेचा मान राखत सोमेश्वर दिवटे यांना पहिली संधी मिळावी अशी विनंती केली, त्यामुळे समन्वयाने हा निर्णय घेण्यात आला. दुसरी जागा सेवा समितीमध्ये सुरुवातीपासून धडाडीने कार्यरत असलेले जावेद पठाण यांना देण्यात आली आहे. तर तिसऱ्या जागेसाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीला संधी द्यावी, अशी भावना सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केली होती, त्यानुसार रचना मालपाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
स्वीकृत सदस्यांसाठीचे अर्ज आज दाखल करण्यात आले असून, उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या प्रक्रियेत त्यांची अधिकृत निवड जाहीर होईल. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, सकाळी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत (पार्टी मीटिंग) सर्व नगरसेवकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. तसेच येत्या १० दिवसांत विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी देखील पूर्ण केल्या जातील, ज्यामध्ये कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.
संगमनेर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सोमेश्वर दिवटे, जावेद पठाण व रचना मालपाणी यांची वर्णी; आमदार सत्यजित तांबे यांनी केली घोषणा, उद्याच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब!
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, सकाळी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत (पार्टी मीटिंग) सर्व नगरसेवकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल.


संगमनेर, प्रतिनिधी –
या निवडीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की,



