Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘थोरात-तांबे’ गटाची मोहोर उमटलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नूरमोहम्मद शेख तर स्वीकृतच्या माध्यमातून मालपाणी परिवाराची सत्तेत एन्ट्री, रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण स्वीकृत नगरसेवक!
निवडणूक

‘थोरात-तांबे’ गटाची मोहोर उमटलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नूरमोहम्मद शेख तर स्वीकृतच्या माध्यमातून मालपाणी परिवाराची सत्तेत एन्ट्री, रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण स्वीकृत नगरसेवक!

आता या नवीन 'टीम संगमनेर' कडून शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा असून, डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम संगमनेरच्या विकासाचा कोणता नवा टप्पा गाठते, आणि यात मालपाणी परिवार काय योगदान देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | अनंत पांगारकर
संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आता नव्या कारभाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या टीम मध्ये ‘संगमनेर सेवा समिती’चे नूरमोहम्मद शेख यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, स्वीकृत नगरसेवक म्हणून रचना मालपाणी, सोमेश्वर दिवटे आणि जावेद पठाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत हे निर्णय घेण्यात आले.
विकासाचा नवा फॉर्म्युला आणि ‘संगमनेर २.०’ व्हिजन – माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी या निवडी करताना शहराच्या सर्वांगीण विकासाचे ‘व्हिजन’ समोर ठेवले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणुकीपूर्वीच ‘संगमनेर २.०’ हा जाहीरनामा मांडला होता, त्याचीच अंमलबजावणी या निवडींमधून होताना दिसत आहे. विशेषतः सामाजिक आणि उद्योजकता क्षेत्रात मोठे नाव असलेल्या मालपाणी परिवारातील रचना मालपाणी यांना सत्तेत सहभागी करून घेतल्याने, शहराच्या नियोजनाला आता कॉर्पोरेट आणि सामाजिक कार्याचा नवा आयाम मिळणार असल्याचे मानले जात आहे.
विरोधकांचे पानिपत आणि सेवा समितीचे वर्चस्व – नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत थोरात-तांबे आणि खताळ-विखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, सेवा समितीने २८ पैकी तब्बल २७ जागा जिंकत विरोधकांना जोरदार धक्का दिला. विशेष म्हणजे, एकेकाळी पालिकेत प्रभाव असलेल्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. महायुतीकडून केवळ शिवसेनेची एक महिला उमेदवार निवडून येऊ शकली, तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. मैथिली तांबे यांनी सुवर्णा खताळ यांचा १६ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव करून राज्यात आपला दबदबा निर्माण केला.
इच्छुकांची गर्दी अन् तांबे यांचा समतोल- एकहाती बहुमत मिळाल्याने उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती, यामुळे नेत्यांचा मोठा कस लागला. मात्र, आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वसमावेशक फॉर्म्युला ठरवत नूरमोहम्मद शेख यांच्या रूपाने अल्पसंख्याक समाजाला, तर दिवटे यांच्या रूपाने अनुभवी आणि पठाण यांच्या रूपाने निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. या निवडी जाहीर होताच पालिकेच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.
आता या नवीन ‘टीम संगमनेर’ कडून शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा असून, डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम संगमनेरच्या विकासाचा कोणता नवा टप्पा गाठते, आणि यात मालपाणी परिवार काय योगदान देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,060
इंडियन फॉरवर्ड ब्लॉक उपनगराध्यक्ष जावेद पठाण नूरमोहम्मद शेख मैथिली तांबे रचना मालपाणी संगमनेर सेवा समिती सत्यजित तांबे सोमेश्वर दिवटे स्वीकृत नगरसेवक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.