Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेच्या विषय समित्यांचे ‘कारभारी’ निश्चित; सत्ताधारी सेवा समितीचे वर्चस्व, विरोधकांनाही स्थान! प्रशासक राज संपले तरी कार्यपद्धतीत सुधारणा नाही
निवडणूक

संगमनेर पालिकेच्या विषय समित्यांचे ‘कारभारी’ निश्चित; सत्ताधारी सेवा समितीचे वर्चस्व, विरोधकांनाही स्थान! प्रशासक राज संपले तरी कार्यपद्धतीत सुधारणा नाही

पालिकेतील प्रशासक राज संपून नवीन लोकप्रतिनिधी आले असले तरी, प्रशासकीय कार्यपद्धतीत अद्याप सुधारणा झालेली नसल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2026Updated:19/01/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनंत पांगारकर

संगमनेर नगरपालिकेचा कारभार संगमनेर सेवा समितीच्या हाती गेल्यानंतर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांना सभापती पदाची संधी देतानाच, दोन अपक्ष आणि शिवसेनेच्या महिला उमेदवारालाही समित्यांमध्ये स्थान देऊन सर्वसमावेशक कारभाराचे संकेत देण्यात आले आहेत.

सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. या बैठकीत सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या.

अशा आहेत नवनियुक्त समित्या:

नगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती पदी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून शेख नूरमोहम्मद, किशोर पवार, अनुराधा सातपुते, सरोजना पगडाल, किशोर टोकसे, मुजीब पठाण खान, डॉ. दानिशखान पठाण, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांचा समावेश आहे. 

सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी किशोर हिरालाल पवार यांची निवड झाली असून या समितीत सौरभ कासार, गजेंद्र अभंग, गणेश गुंजाळ, अमजदखान पठाण, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, योगेश जाजू व साक्षी सूर्यवंशी हे सदस्य म्हणून काम पाहतील. 

शिक्षण समितीच्या सभापती पदी अनुराधा सातपुते यांची वर्णी लागली असून सीमा खटाटे, वनिता गाडे, गणेश गुंजाळ, प्रियांका शाह, नंदा गरुडकर, शेख दिलशाद, रचना मालपाणी व साक्षी सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदाची जबाबदारी किशोर टोकसे यांच्याकडे सोपवण्यात आली असून प्रियांका शाह, शैलेश कलंत्री, सीमा खटाटे, सौरभ कासार, शोभा पवार, अमजदखान पठाण, जावेद खान पठाण व साक्षी सूर्यवंशी हे या समितीचे सदस्य असतील. 

पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी मुजीबखान पठाण यांची निवड झाली असून सदस्य म्हणून भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, शोभा पवार, मालती डाके, नितीन अभंग, विजया गुंजाळ, सोमेश्वर दिवटे व साक्षी सूर्यवंशी यांचा समावेश आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी सरोजना पगडाल तर उपसभापती पदी प्रिया काशीद यांची निवड झाली आहे. या समितीमध्ये अर्चना दिघे, वनिता गाडे, दिपाली पंचारिया, विजया गुंजाळ, शकीला बेग, रचना मालपाणी व साक्षी सूर्यवंशी हे सदस्य असतील. 

नियोजन आणि विकास समितीचे पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख असून भारत बोऱ्हाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दिपाली पंचारिया, योगेश जाजू, जावेद खान पठाण व साक्षी सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरम्यान पालिकेतील विरोधी शिवसेना पक्षाच्या एकमेव नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांना देखील विविध समित्यांमध्ये संधी दिल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख आणि सूर्यवंशी यांचे पती विनोद सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र संवाद न्यूज शी बोलताना सांगितले.

⏩ प्रशासनाचा ‘गहाळपणा’ चव्हाट्यावर – निवडीची प्रक्रिया पार पडली असली तरी, प्रशासनाच्या कामातील ढिसाळपणा या पहिल्याच बैठकीत समोर आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी उशिरापर्यंत चालली. मात्र, निवडी जाहीर झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत यादी माध्यमांना देण्यात आली नाही. वारंवार मागणी करूनही “यादी तयार नाही” असे उत्तर मीटिंग लिपिकाकडून मिळाले. नंतर मात्र लिपिक पठाण यांनी फोन घेण्याचे देखील टाळले. पालिकेतील प्रशासक राज संपून नवीन लोकप्रतिनिधी आले असले तरी, प्रशासकीय कार्यपद्धतीत अद्याप सुधारणा झालेली नसल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,199
दयानंद गोरे धीरज मांजरे मैथिली तांबे विषय समित्या निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.