Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये वाळू तस्करांवर महसूलचा सर्जिकल स्ट्राईक; २० लाखांचे पोकलंड जप्त, आरोपी फरार
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये वाळू तस्करांवर महसूलचा सर्जिकल स्ट्राईक; २० लाखांचे पोकलंड जप्त, आरोपी फरार

या धडक कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचे पोकलंड मशीन जप्त करण्यात आले असून, शासकीय कामात अडथळा आणून पळून गेलेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2026Updated:19/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

थेट पालकमंत्र्यांनीच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. संगमनेर तालुक्यातील रायते शिवारात प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या विरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचे पोकलंड मशीन जप्त करण्यात आले असून, शासकीय कामात अडथळा आणून पळून गेलेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकातील ग्राम महसूल अधिकारी अविष्कार विश्वनाथ थोरात हे १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पथकासह गस्तीवर होते. तहसीलदार मांजरे साहेब यांच्या आदेशानुसार हे पथक रायते येथील प्रवरा नदी पात्रात पोहचले. यावेळी तिथे एक पिवळ्या रंगाचे पोकलंड मशीन (चेसी नं. N604D0025) अनधिकृतपणे वाळू उपसा करताना आढळून आले. घटनास्थळी साधारण १०० ते १२५ ब्रास वाळूचा अवैध साठा पथकाला दिसून आला.

या कारवाईदरम्यान पथकाने पोकलंड मशीन जवळ उभ्या असलेल्या इसमाची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव तन्वीर कबीर शेख (रा. संगमनेर) असल्याचे सांगितले. महसूल अधिकाऱ्यांनी मशीनची चावी मागितली असता, तन्वीर शेख याने चावी देण्यास नकार दिला आणि ती स्वतःकडे ठेवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी अविष्कार थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. क्रमांक ००६५/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), २२१ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या मोहिमेत संगिता चतुरे, अनुपमा गांगुर्डे, मंगल सांगळे, मंगल डोंगरे आणि आरती साठे या महिला महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,440
कारवाई धीरज मांजरे वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.