Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्व. शेखर शेळके यांच्या स्मृती क्रिकेट स्पर्धेतून जिवंत; घारगाव येथे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ
क्रिडा व कला

स्व. शेखर शेळके यांच्या स्मृती क्रिकेट स्पर्धेतून जिवंत; घारगाव येथे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ

संगमनेर तालुक्यात झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर आता गावोगावी क्रिकेटचे आयोजन होत असून, खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

बोटा येथील स्व. शेखर शेळके यांनी क्रिकेट खेळाप्रती दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे योगदान आजही पठार भागात स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी ‘स्व. शेखर शेळके चषक २०२६’ आयोजित करून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.

घारगाव येथे स्व. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ आणि स्व. शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, सरपंच नितीन आहेर, उपसरपंच रेश्मा धात्रक, चंद्रकांत घुले, संतोष शेळके, सुहास वाळुंज, रमेश आहेर, सर्जेराव ढमढेरे, सुरेश गाडेकर, हारून शेख यांच्यासह पठार भागातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार खताळ पुढे म्हणाले की, जनार्दन आहेर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना केवळ एक सशक्त व्यासपीठच उपलब्ध करून दिले नाही, तर खेळाच्या माध्यमातून नेतृत्व घडवण्याचे कामही केले आहे. स्व. शेखर शेळके यांनी अनेक वर्षे क्रिकेट स्पर्धांसाठी घेतलेला पुढाकार आजही प्रेरणादायी असून, या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे नाव कायम जिवंत राहणार आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर आता गावोगावी क्रिकेटचे आयोजन होत असून, खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे.

पठार भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जनार्दन आहेर यांनी नेहमीच संघर्ष केला असून, त्यांच्या या कार्याचे आमदार खताळ यांनी कौतुक केले. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन सातत्याने सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हारून शेख यांनी केले, तर जनार्दन आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 365
क्रिकेट स्पर्धा घारगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.