Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील दोन महत्त्वपूर्ण देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
धार्मिक

संगमनेर तालुक्यातील दोन महत्त्वपूर्ण देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

श्री क्षेत्र खंडोबा आणि श्री क्षेत्र विठोबा धांदरफळ हे संगमनेर तालुक्यातील एक महत्त्वाचे देवस्थानाचे ठिकाण आहे. या तीर्थक्षेत्राला 'क' वर्ग दर्जा मिळाल्यामुळे देवस्थान पर्यटनाला चालना मिळेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2026Updated:26/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, २६ जानेवारी
संगमनेर तालुक्यातील धार्मिक आणि सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान (खळी) आणि श्री क्षेत्र विठोबा देव मंदिर (धांदरफळ बु.) या दोन देवस्थानांना शासनाकडून अधिकृतपणे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. 
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता या दोन्ही देवस्थानांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विशेष दर्जामुळे जिल्हा नियोजन समिती आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून देवस्थान परिसरासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीचा विनियोग भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सुसज्ज अंतर्गत रस्ते, विद्युत व्यवस्था, भव्य सभामंडप, भक्तनिवास आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी केला जाणार आहे. केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण पावले उचलणे आता शक्य होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. आमदार तांबे यावेळी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी नेहमीच दूरदृष्टी ठेवून योजना राबवल्या आहेत. त्याच वारशातून श्री क्षेत्र खंडोबा आणि श्री क्षेत्र विठोबा या देवस्थानांना हा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. या विकासामुळे केवळ भाविकांची गैरसोय दूर होणार नाही, तर धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
या निर्णयाचे धांदरफळ व खळी येथील ग्रामस्थांनी तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. देवस्थानच्या विकासासाठी आणि गावाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात या निधीतून होणारी कामे संगमनेरच्या धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर या दोन्ही गावांना मानाचे स्थान मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. श्री क्षेत्र खंडोबा आणि श्री क्षेत्र विठोबा धांदरफळ हे संगमनेर तालुक्यातील एक महत्त्वाचे देवस्थानाचे ठिकाण आहे. या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे देवस्थान पर्यटनाला चालना मिळेल. – आमदार सत्यजीत तांबे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 649
तीर्थक्षेत्र दर्जा सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.