Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » इतिहास पुसला जातोय… संगमनेरच्या वैभवशाली वारशाची दयनीय अवस्था; ॲड. शेख यांचा संताप!
पत्रकारिता

इतिहास पुसला जातोय… संगमनेरच्या वैभवशाली वारशाची दयनीय अवस्था; ॲड. शेख यांचा संताप!

शहर विकासाचे नवे व्हिजन २.० समोर घेऊन संगमनेर नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, त्यांचे सहकारी नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन जागे होऊन या सर्व ठिकाणच्या कोनशिलांची आणि प्रवेशद्वारांची तातडीने डागडुजी करून त्यांचा सन्मान राखणार का, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2026Updated:26/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | अनंत पांगारकर
संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक वास्तू आणि ऐतिहासिक कोनशिला सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नुकत्याच साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील सुज्ञ नागरिक ॲड. सैफुद्दीन शेख यांनी या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर हा वारसा नष्ट होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ॲड. शेख यांनी म्हटले आहे की, संगमनेर नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या प्रवेशद्वारावर असलेले गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक ‘प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी’ यांच्या नावाचा फलक पूर्णपणे गंजला असून, त्यावरील अक्षरेही आता पुसली गेली आहेत.
विशेष म्हणजे, प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आपल्या गाड्यांनिशी याच प्रवेशद्वारातून आत गेले होते, मात्र या ऐतिहासिक नावाच्या दुरवस्थेकडे एकाही जबाबदार अधिकाऱ्याचे लक्ष जाऊ नये, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
केवळ क्रीडा संकुलच नव्हे, तर संगमनेर नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणच्या कोनशिलांची, नाम फलकांची अवस्था अशीच बिकट झाली आहे. यामध्ये रंगार गल्ली, डी. एड. कॉलेज परिसर आणि स्वतः नगरपालिकेच्या आवारातील अनेक कोनशिलांचा यात समावेश आहे. या कोनशिला केवळ दगड किंवा फलक नसून तो शहराचा इतिहास आणि थोर व्यक्तींच्या स्मृती आहेत. मात्र, देखभालीच्या अभावामुळे अनेक ठिकाणचे नाव फलक गंजले आहेत, काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी अक्षरे पूर्णपणे पुसली गेल्याने या कोनशिला नेमक्या कोणाच्या स्मरणार्थ आहेत, हे ओळखणेही कठीण झाले आहे.
शहराच्या सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नगरपालिकेला आपल्याच मालकीच्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या फलकांची दुरुस्ती करण्याचे सुचू नये, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘आज प्रजासत्ताक दिनी आम्ही देशाच्या प्रगतीच्या गप्पा मारतो, पण आपल्या स्थानिक वास्तूंचा सन्मान राखण्यात आपण अपयशी ठरत आहोत’ अशी भावना त्यांनी “महाराष्ट्र संवाद न्यूज वेब पोर्टल”शी बोलताना स्थानिक रहिवासी म्हणून व्यक्त केली आहे.
त्यामुळे शहर विकासाचे नवे व्हिजन २.० समोर घेऊन संगमनेर नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, त्यांचे सहकारी नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन जागे होऊन या सर्व ठिकाणच्या कोनशिलांची आणि प्रवेशद्वारांची तातडीने डागडुजी करून त्यांचा सन्मान राखणार का, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,391
कोनशीला दुरवस्था नाम फलक सैफुद्दीन शेख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.