Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बस स्थानकाच्या वैभवात पडणार भर; आमदार सत्यजित तांबेंचा बसस्थानक विकासासाठी मास्टरप्लॅन! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट, बैठकीत या प्रश्नांवर चर्चा; मंत्री सरनाईक म्हणाले…
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर बस स्थानकाच्या वैभवात पडणार भर; आमदार सत्यजित तांबेंचा बसस्थानक विकासासाठी मास्टरप्लॅन! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट, बैठकीत या प्रश्नांवर चर्चा; मंत्री सरनाईक म्हणाले…

बसस्थानक परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. संगमनेर नगरपालिकेने याला पायबंद घालण्याचा निर्णय घेतला असून, परिवहन विभागानेही आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत कडक सूचना द्याव्यात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2026Updated:02/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: विशेष प्रतिनिधी

संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या संगमनेर बसस्थानक परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी कंबर कसली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची भेट घेऊन आमदार तांबे यांनी बसस्थानक परिसरातील विविध समस्यांचे निवेदन सादर केले. 

आमदार तांबे यांनी यासंदर्भात महत्त्वाचे ट्विट करत माहिती दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांकडे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक लक्ष दिले असून, लवकरच यावर ठोस अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे म्हटले आहे.

https://x.com/i/status/2018255157272904060

संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा प्रस्तावित आहे. या स्मारकाची भव्यता लक्षात घेता त्यासाठी वाढीव जागेची गरज असून, ती तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी तांबे यांनी यावेळी केली. स्मारकामुळे शहराच्या सौंदर्यात आणि अस्मितेत भर पडणार असल्याने याला प्राधान्य मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

याचबरोबर बसस्थानक परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. संगमनेर नगरपालिकेने याला पायबंद घालण्याचा निर्णय घेतला असून, परिवहन विभागानेही आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत कडक सूचना द्याव्यात, जेणेकरून बसस्थानकाचे पावित्र्य राखले जाईल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

बसस्थानकातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण हा प्रवाशांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरत आहे. तांबे यांनी या संदर्भात पार्किंग सुविधा तात्काळ कार्यान्वित करण्याची आणि अतिक्रमणांबाबत कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, सामाजिक बांधिलकी जपत बसस्थानक संकुलात अपंग लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेले गाळे अद्यापही प्रलंबित असून, ते संबंधित लाभार्थ्यांना विनाविलंब हस्तांतरित करावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

विमानतळाच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या बसस्थानकाच्या नियमित स्वच्छतेचा प्रश्नही त्यांनी मंत्र्यांसमोर मांडला. इतक्या उच्च दर्जाच्या वास्तूची नियमित देखभाल आणि स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सत्यजित तांबे यांच्या या पाठपुराव्यामुळे संगमनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे असून, प्रवाशांना आणि स्थानिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. या बैठकीमुळे संगमनेरच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 925
प्रताप सरनाईक बैठक संगमनेर बस स्थानक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.