Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवणार; शिर्डीत ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा एल्गार
बैठक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवणार; शिर्डीत ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा एल्गार

या मेळाव्यामुळे शिर्डी लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला मोठी गती मिळाली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी:

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व गट-तट विसरून शिवसैनिकांची वज्रमूठ सहाही तालुक्यांत पक्षाला मोठा विजय मिळवून देईल, असा निर्धार शिवसेनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित कार्यकारिणीची निर्धार बैठक आणि सत्कार सोहळा शिर्डी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूरचे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले. या बैठकीच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभेतील ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी संघटनात्मक बदलाचा जो प्रयोग केला आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील म्हणाले की, अकोले, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर यांसारख्या महत्त्वाच्या तालुक्यांत गेल्या दोन-दोन दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंतांना आता महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. ही नवी फळी प्रत्येक गटात आणि गणात निवडणूक नियोजनासाठी सज्ज असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीनिशी उतरणार आहे.

जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर, बाळासाहेब जाधव, प्रमोद अण्णा लबडे, नाना बावके, लखन भगत, संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, कोपरगाव विधानसभा संपर्कप्रमुख आशुतोष मार्कंडे आणि उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनीही आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या सोहळ्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, संगमनेर तालुकाप्रमुख (पश्चिम) भाऊसाहेब हासे, तालुकाप्रमुख (पूर्व) भीमाशंकर पावसे, विधानसभा प्रमुख योगेश खेमनर, शहरप्रमुख अमित चव्हाण आणि फैसल सय्यद, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा संघटक दिपक साळुंके, शहर संघटक आसिफ तांबोळी, वाहतूक सेना (रिक्षा सेना) तालुकाप्रमुख अशोक बडे, वाहतूक सेना शहरप्रमुख माघाडे, तालुकाप्रमुख (अश्वि मंडल) प्रकाशराजे गायकवाड, बोटा मंडलप्रमुख अमित फटांगरे, युवासेना (पठारभाग) तालुकाप्रमुख लखन सोन्नर, युवा तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना विधानसभाप्रमुख अमोल डुकरे आणि तालुकासंघटक मच्छिंद्र दिघे यांचा समावेश होता.

तसेच उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारलेले सचिन दिघे, राजाभाऊ सातपुते, बाळासाहेब हासे, रवी गिरी, भाऊसाहेब वराळे, त्र्यंबक शिंदे, अरुण भालेराव, एकनाथ खेमनर, संजय सोनवणे, कैलास नवले आणि गोकुळ लांडगे यांचाही सत्कार करण्यात आला. व्यापारी आघाडीचे शहरप्रमुख संभव लोढा, उपशहरप्रमुख रहिम बेग, परवेझ शेख, मुकेश काठे, प्रविण चव्हाण, दीपक वन्नम, जितेंद्र दर्वे, अनिल खुळे यांच्यासह महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, संगीता गायकवाड आणि वैशाली वडतले यांनाही सन्मानित करण्यात आले.

या मेळाव्यामुळे शिर्डी लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला मोठी गती मिळाली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 605
बैठक मेळावा शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.