Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रघुवीर खेडकरांचा ‘पद्मश्री’ हा महाराष्ट्राच्या मातीतील सर्व लोककलावंतांचा सन्मान – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

रघुवीर खेडकरांचा ‘पद्मश्री’ हा महाराष्ट्राच्या मातीतील सर्व लोककलावंतांचा सन्मान – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

'संगमनेर हीच माझी आई आणि बाप' - खेडकर यांच्या भावूक उद्गारांनी संगमनेरकर भारावले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला असून, या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर राज्यभरातील तमाम लोककलावंतांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. 

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांच्या संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, प्रसिद्ध उद्योगपती राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. संजय दळवी, हिरालाल पगडाल यांच्यासह खेडकर कुटुंबीय आणि शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत सांगितले की, कवी अनंत फंदींपासून ते विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर आणि गुलाबबाई संगमनेरकर यांच्यापर्यंत या भूमीला मोठी कला परंपरा लाभली आहे. १८५७ चा उठाव, स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोककलावंतांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. विशेषतः कोरोनासारख्या कठीण काळातही खेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांची आणि कलेची साथ सोडली नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात नवी आव्हाने पेलत त्यांनी ही कला जिवंत ठेवली असून, पद्मश्री च्या माध्यमातून आज ते खऱ्या अर्थाने देशाचे कलावंत झाले आहेत, याचा संगमनेरकरांना सार्थ अभिमान आहे.

या सत्काराला उत्तर देताना पद्मश्री रघुवीर खेडकर अत्यंत भावूक झाले होते. हा पुरस्कार मला मिळाला आहे असे मला आजही वाटत नाही, तर हे महाराष्ट्रातील रसिकांचे प्रेम आहे. संगमनेर ही माझी कर्मभूमी असून या मातीने मला जगण्याचे संस्कार दिले. संगमनेर हीच माझी आई आणि बाप आहे. आपला अखेरचा प्रवासही येथेच व्हावा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वयाच्या नवव्या वर्षी रंगमंचावर आल्यापासूनचा संघर्षमय प्रवास आठवताना आणि हा दैदिप्यमान सोहळा पाहताना आईची उणीव भासत असल्याचे सांगताच त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. महाराष्ट्रातील रसिक आणि संगमनेरकरांच्या प्रेमामुळेच मी इथवर पोहोचलो असून हा पुरस्कार खऱ्या अर्थाने रसिकांचाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी यावेळी सरकारकडे तमाशा कलावंतांसाठी आर्थिक अनुदानाची मागणी केली. ते म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी विकासाचा पाया रचला आणि बाळासाहेब थोरात यांनी तो वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी आधी कांताबाई सातारकर आणि आता रघुवीर खेडकर यांच्या पद्मश्रीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, आगामी काळात बाळासाहेब थोरात पुन्हा सत्तेत येतील, अशी भावनिक इच्छाही व्यक्त केली.

आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, तमाशा ही महाराष्ट्राची ओळख असून या पुरस्कारामुळे या लोककलेचा गौरव झाला आहे. या यशामुळे नव्या पिढीतील कलावंतांना मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रघुवीर खेडकर यांचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि शिस्तबद्ध परेडने त्यांना मानवंदना देण्यात आली. ‘नटरंग उभा’ या गीताच्या सुरावटीत झालेल्या या सोहळ्यात खेडकर यांनी व्यासपीठावरून खाली उतरून प्रेक्षकांना घातलेला दंडवत हा सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला. खेडकर यांच्या या साधेपणाने आणि कृतज्ञतेने उपस्थित रसिकांचे डोळे पाणावले होते. या हृदयस्पर्शी सोहळ्याने संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 748
नागरी सत्कार बाळासाहेब थोरात रघुवीर खेडकर सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.