Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिकेचा ‘शास्ती’चा जाच कायम; सरकारी आदेशाला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली! सहा महिने झाले तरी सॉफ्टवेअर अपडेट का नाही? माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांचा सवाल
सामाजिक

संगमनेर पालिकेचा ‘शास्ती’चा जाच कायम; सरकारी आदेशाला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली! सहा महिने झाले तरी सॉफ्टवेअर अपडेट का नाही? माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांचा सवाल

विशेष म्हणजे, नागरिक कर भरण्यास उशीर करतात तेव्हा नगरपालिका त्यांच्याकडून दंड आणि व्याज वसूल करते; मग आता त्याच तत्त्वानुसार कामात सहा महिने दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सॉफ्टवेअर कंपनीला दंड का लावला जाऊ नये
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

राज्य सरकारने घरपट्टी शास्ती आणि दंड माफीचा निर्णय घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी संगमनेर नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अद्याप या सवलतीचा लाभ मिळालेला नाही. याउलट, सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत नागरिकांकडून जादा रक्कमेची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि सॉफ्टवेअर कंपनीवर कठोर कारवाई करून नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

राज्य सरकारने शास्ती माफीचा जीआर काढल्यानंतर संगमनेरमध्ये याचे मोठे स्वागत झाले होते. अनेकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचेही प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर आनंदीआनंदच पाहायला मिळत आहे. सरकारच्या या घोषणेनंतर प्रामाणिक करदात्यांनी आपली घरपट्टी आणि नळपट्टी भरण्यासाठी पालिकेत धाव घेतली. मात्र, तेथे गेल्यावर नागरिकांना धक्काच बसला. शासन निर्णय झालेला असतानाही नगरपालिका कर्मचारी शास्तीसह पूर्ण रक्कम भरून घेत असल्याचे समोर आले. जेव्हा नागरिकांनी या वाढीव रकमेबाबत विचारणा केली, तेव्हा ‘सरकारचे सॉफ्टवेअर अजून अपडेट झाले नाही’ आणि ‘आम्हाला तसे आदेश नाहीत’ अशी उडवाउडवीची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

या प्रकारामुळे हतबल झालेल्या अनेक नागरिकांनी नाईलाजाने दंडासह घरपट्टी भरली आहे. सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या बेजबाबदार आणि कामचुकार कारभारामुळे संगमनेरकरांना आर्थिक फटका सोसावा लागला आहे. जर सॉफ्टवेअर कंपनीची ही चूक असेल, तर त्या कंपनीला तात्काळ दंड करून नागरिकांकडून वसूल केलेली जादा रक्कम परत मिळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, नागरिक कर भरण्यास उशीर करतात तेव्हा नगरपालिका त्यांच्याकडून दंड आणि व्याज वसूल करते; मग आता त्याच तत्त्वानुसार कामात सहा महिने दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सॉफ्टवेअर कंपनीला दंड का लावला जाऊ नये, असा सवाल कैलास वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.

हे कृत्य जाणीवपूर्वक केले गेले की कोणाच्या दबावाखाली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जर जिल्हा प्रशासनाने आणि सरकारने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषींवर तातडीने कारवाई केली नाही, तर संगमनेरकर नागरिक आणि शिवसेना या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.

या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सर्वस्वी शासन आणि पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या मागणीमुळे आता जिल्हाधिकारी यावर काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 499
कैलास वाकचौरे शास्ती कर शास्ती माफी संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.