Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार: आमदार सत्यजित तांबे
धार्मिक

संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार: आमदार सत्यजित तांबे

शहरासोबतच तालुक्यातही शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृत उद्योग समूह आणि यशोधन कार्यालय येथेही महाराजांना अभिवादन करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार असून येत्या वर्षभरात या पुतळ्याचे काम पूर्ण करून पुढच्या वर्षीची जयंती याच ठिकाणी साजरी केली जाईल. यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, संविधान स्मारक आणि १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा उभारून बसस्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

शिवजयंती निमित्त शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक वेशभूषा आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने संपूर्ण शहर शिवमय झाले होते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

आमदार तांबे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे आराध्य दैवत असून त्यांचा विचार प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. 

नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवरायांचे विचार घेऊन संगमनेर शहर आदर्श करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक कटिबद्ध आहेत. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही यावेळी नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

संगमनेर नगरपरिषद, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निघालेली ही मिरवणूक बाजारपेठ, सय्यद बाबा चौक, तेली खुंट आणि मेनरोड मार्गे काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व नगरसेविकांनी पारंपारिक फेटे परिधान केले होते. अश्वारूढ बाल शिवाजी, मर्दानी खेळ आणि जागोजागी झालेली पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. ‘हर हर महादेव’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी संपूर्ण संगमनेर नगरी दुमदुमून गेली होती.

या सोहळ्याला नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, मुख्याधिकारी दयानंद गोरे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते.

शहरासोबतच तालुक्यातही शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृत उद्योग समूह आणि यशोधन कार्यालय येथेही महाराजांना अभिवादन करण्यात आले. तर विविध सहकारी संस्थांमध्येही उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 545
शिवजयंती उत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.